Friday , 19 July 2024
Home मोक्कार टाईमपास Kaho Naa Pyaar Hai : ‘कहो ना प्यार है’साठी हृतिक-अमिषा पटेल पहिली पसंती नव्हतेच, वाचा…
मोक्कार टाईमपास

Kaho Naa Pyaar Hai : ‘कहो ना प्यार है’साठी हृतिक-अमिषा पटेल पहिली पसंती नव्हतेच, वाचा…

Kaho Naa Pyaar Hai : 'कहो ना प्यार है'साठी हृतिक-अमिषा पटेल पहिली पसंती नव्हतेच, वाचा…
Kaho-Naa-Pyaar-Hai : Sillytalk

Kaho Naa Pyaar Hai : बॉलिवूडमध्ये ग्रीक गॉड म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता हृतिक रोशनचा डेब्यू चित्रपट ‘कहो ना प्यार है’ रिलीज होऊन 20 पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत.

दिग्दर्शक राकेश रोशन यांचा हा चित्रपट 14 जानेवारी 2000 रोजी प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटाने प्रेक्षकांची मने तर जिंकलीच पण बॉक्स ऑफिसवरही प्रचंड कमाई केली.

पण या चित्रपटासाठी हृतिक रोशनची पहिली पसंती नव्हती हे क्वचितच कुणाला माहीत असेल.

होय, राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो ना प्यार है’साठी (Kaho-Naa-Pyaar-Hai) किंग ऑफ रोमान्स शाहरुख खानला हृतिकसमोर ऑफर करण्यात आली होती.

राकेशला त्याच्या चित्रपटात किंग खानला कास्ट करायचे होते.

पण त्यावेळी हृतिकने आपल्या वडिलांना आपल्या चित्रपटात नवीन चेहरा घ्यावा, असा सल्ला दिला होता.

हीच योग्य वेळ आहे जेव्हा तुम्ही नवीन आलेल्याला संधी द्यावी.

या सल्ल्यानंतरच राकेश रोशनने या चित्रपटाद्वारे हृतिकचे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला.

या चित्रपटात शाहरुख खानमुळेच हृतिक रोशनला मुख्य भूमिकेत कास्ट करण्यात आले होते.

हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

10 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 80 कोटींची कमाई केली. या चित्रपटाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

त्याचबरोबर केवळ हृतिकच नाही तर अमिषा पटेलही या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हती. या चित्रपटात अमिषाच्या आधी अभिनेत्री करीना कपूरला कास्ट करण्यात आले होते.

इतकंच नाही तर करिनाने चित्रपटातील काही सीन्स शूटही केले होते, मात्र तिची आई बबिता यांच्या हस्तक्षेपामुळे राकेशने करीनाला चित्रपटातून काढून टाकले आणि तिच्या जागी अमिषा पटेलला कास्ट केले.

हृतिकच्या डेब्यू चित्रपटाने एकूण 102 पुरस्कार जिंकले, हा एक विक्रम आहे.

सध्या हृतिक पत्नी सुझैनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री सभा आझाद सोबत फिरताना दिसतो. तर अमिषा पटेलह अजूनही अविवाहित आहे.

पहिल्या हिट चित्रपटानंतर अमिषाने गदर सारखा सुपरहिट चित्रपट दिला. त्यानंतर मात्र तिच्या कारकिर्दीत म्हणावे असे चित्रपट तिने केले नाही.

सध्या ती छोटे-मोठे रोल करताना दिसते. अनेकदा वादात देखील सापडते.

Related Articles

Weighty but glamorous actress
मोक्कार टाईमपास

Weighty Famous Actress : वजनदार पण ग्लॅमरस असलेल्या अभिनेत्री.

Weighty Glamorous Actress : झिरो फिगर नसलेल्या पण तरीही फॅनबेस असलेल्या वजनदार...

मोक्कार टाईमपास

Bollywood Movies : थोडं जरी बोर झालं की ‘हे’ चित्रपट आवर्जून पाहाच!

तुम्हाला फ्रेश करतील अशा काही गोष्टी घडणे अपेक्षित आहे. त्यापैकी एक गोष्ट...

Adult Web Series : मुलांना 'या' 5 वेबसिरीज कधीही पाहू देऊ नका, अन्यथा गडबड होईल…
मोक्कार टाईमपास

Adult Web Series : मुलांना ‘या’ 5 वेबसिरीज कधीही पाहू देऊ नका.

Adult Web Series : तरुणांनामध्ये क्रेझ असलेल्या वेब सिरीजमध्ये चित्रपटांपेक्षा वेगळा कंटेंट...

Raveena Tandon : किसींगसाठी नकार ते अटींचा भडीमार, रवीना टंडनची स्टाईलच वेगळी होती…
मोक्कार टाईमपास

Raveena Tandon : किसींगसाठी नकार ते अटींचा भडीमार, रवीना टंडनची स्टाईलच वेगळी होती…

Raveena Tandon : रवीना टंडन ही इंडस्ट्रीतील अशा सौंदर्यवतींपैकी एक आहे, एका...