Saturday , 14 September 2024
Home मोक्कार टाईमपास Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना मराठी मुलीशी लग्न करायचे होते पण…
मोक्कार टाईमपास

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना मराठी मुलीशी लग्न करायचे होते पण…

Amitabh Bachchan : Sillytalk

Amitabh Bachchan : बॉलिवूड चित्रपटांचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, ज्यांना इंडस्ट्रीचे सुपरस्टार देखील म्हटले जाते.

ते पाच दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये सक्रिय आहेत. अमिताभ बच्चन यांच्या करिअरची सुरुवात बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटांनी झाली.

आज आम्‍ही तुम्‍हाला अमिताभच्‍या पहिल्‍याच चित्रपटापासूनच्‍या पर्सनल लाइफमध्‍ये घडलेली एक घटना सांगणार आहोत, ज्यानंतर त्यांचं सर्व आयुष्य बदलून गेलं.

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन पडले मराठी मुलीच्या प्रेमात

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी अमिताभ बच्चन नोकरीच्या शोधात 1963 मध्ये कोलकाता येथे पोहोचले होते.

येथे अमिताभ यांना शॉ वॉलेस या दारू कंपनीत नोकरी मिळाली.

काही दिवस दारू कंपनीत काम केल्यानंतर अमिताभ बच्चन यांना ‘बर्ड अँड कंपनी’ या शिपिंग फर्ममध्ये नोकरी मिळाली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन कोलकाता येथे काम करत असताना एका महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात पडले होते.

हेही वाचा : सोलर रूफटॉप सबसिडी योजना; नेमकी काय आहे ‘ही’ योजना? जाणून घ्या

अमिताभ बच्चन यांना दिला नकार

अमिताभ बच्चन यांनाही या मुलीशी लग्न करायचे होते. पण त्या मुलीने अमिताभ बच्चन यांना नकार दिला होता.

रिपोर्ट्सनुसार, या घटनेमुळे अमिताभ इतके दु:खी झाले होते की ते कोलकाता सोडून थेट मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर अमिताभ यांनी कडवी झुंज दिली.

जर आपण चित्रपट कारकिर्दीबद्दल बोललो तर, अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट ख्वाजा अब्बास यांचा ‘सात हिंदुस्तानी’ होता जो 1969 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.

एवढेच नाही तर यानंतर अमिताभचे डझनभर चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप झाले. तथापि, ते म्हणतात त्याप्रमाणे, वाईट वेळ देखील तशीच राहिली नाही.

अमिताभच्या बाबतीतही असेच घडले आणि 1973 मध्ये आलेल्या ‘जंजीर’ चित्रपटातील अमिताभ यांचा अँग्री यंग मॅन अवतार लोकांना पाहायला मिळाला. ‘

जंजीर’ हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि आजपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मागे वळून पाहिले नाही.

अमिताभच्या आजघडीला देखील चित्रपट सृष्टीत सक्रिय आहेत. केबीसी असो किंवा इतर कोणतंही माध्यम ते कायम कार्यरत असल्याचे पाहायला मिळते.

सुपरस्टार माणसाचा उत्साह नवीन अभिनेत्यांसाठी उत्साह देणारा असाच आहे.

आपल्या कारकार्दीप्रमाणे मात्र अमिताभ यांच्या मुलाची कारकिर्द मात्र म्हणावी तितकी प्रभावी राहिली नाही.

अगदी बोटावर मोजण्या इतक्या चित्रपटात अभिषेकची जादू पाहायला मिळाली. सध्या तो ऐश्वर्या, आराध्या आणि चित्रपट यातच बिझी असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Weighty but glamorous actress
मोक्कार टाईमपास

Weighty Famous Actress : वजनदार पण ग्लॅमरस असलेल्या अभिनेत्री.

Weighty Glamorous Actress : झिरो फिगर नसलेल्या पण तरीही फॅनबेस असलेल्या वजनदार...

मोक्कार टाईमपास

Bollywood Movies : थोडं जरी बोर झालं की ‘हे’ चित्रपट आवर्जून पाहाच!

तुम्हाला फ्रेश करतील अशा काही गोष्टी घडणे अपेक्षित आहे. त्यापैकी एक गोष्ट...

Adult Web Series : मुलांना 'या' 5 वेबसिरीज कधीही पाहू देऊ नका, अन्यथा गडबड होईल…
मोक्कार टाईमपास

Adult Web Series : मुलांना ‘या’ 5 वेबसिरीज कधीही पाहू देऊ नका.

Adult Web Series : तरुणांनामध्ये क्रेझ असलेल्या वेब सिरीजमध्ये चित्रपटांपेक्षा वेगळा कंटेंट...

Raveena Tandon : किसींगसाठी नकार ते अटींचा भडीमार, रवीना टंडनची स्टाईलच वेगळी होती…
मोक्कार टाईमपास

Raveena Tandon : किसींगसाठी नकार ते अटींचा भडीमार, रवीना टंडनची स्टाईलच वेगळी होती…

Raveena Tandon : रवीना टंडन ही इंडस्ट्रीतील अशा सौंदर्यवतींपैकी एक आहे, एका...