Bollywood Movies : जमाना सोशल मीडियाचा असला तरी अनेकदा अशी परिस्थिती उद्भवते की, थोडं बोर झाल्याची फिलिंग येते.
मग अशावेळी नक्की काय करावे? हे सुचतच नाही. दरम्यान तुम्हाला फ्रेश करतील अशा काही गोष्टी घडणे अपेक्षित आहे. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे चित्रपट पाहणे.
दरम्यान तुम्ही असे काही Films पाहू शकता जे त्यांच्या आश्चर्यकारक अभिनय आणि कथेमुळे बर्याच वर्षांपर्यंत लक्षात राहतील, असेच आहेत.
चला, तर आम्ही तुम्हाला अशाच काही आश्चर्यकारक चित्रपटांबद्दल (Bollywood Movies) माहिती या लेखामध्ये देणार आहोत.
Bollywood Movies : गली बॉय :
गली बॉय हा चित्रपट झोया अख्तरने दिग्दर्शित केला होता. यात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसले होते.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. यात, मुंबईतील चाळीत राहणाऱ्या मुरादची गोष्ट होती. तो गरिबीतून कसा बाहेर पडतो? एक चांगला रॅपर कसा बनतो? विशेष बाब म्हणजे हा चित्रपट त्यावर्षी ऑस्करसाठी देखील भारतातून पाठविण्यात आला होता.
आर्टिकल 15 :
या यादीतील हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले होते. यामध्ये घटनेच्या आर्टिकल 15 बद्दल सांगण्यात आले आहे. ज्यानुसार जात, धर्म, रंग, समानतेच्या अधिकारानुसार जन्मस्थळामुळे कोणाचाही भेदभाव केला जाणार नाही. सर्व बाबी भारतात समान आहेत. आयुष्मान खुरानाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी हा एक मानला जातो. संवेदनशील विषयावर बनलेला हा चित्रपट आपल्याला विचार करायला भाग पाडतो.
बाला :
या यादीतील हा तिसरा चित्रपट आहे. यात अभिनेता आयुष्मान खुराणा 25 वर्षाच्या वयात टक्कल पडलेल्या एका तरूणाची भूमिका साकारताना दिसला. ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होतो. यात आयुष्यमानसोबत यामी गौतम, भूमी पेडणेकर मुख्य भूमिकते दिसली होती. आपण स्वतःला स्वतःप्रमाणे स्वीकारायला हवे, हे या चित्रपटातून दाखवले गेले होते.
छिछोरे :
या यादीतील हा चौथा चित्रपट आहे. याची कथा आणि विनोदीत कमळाची ताकद होती, ज्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी झाला होता. हा चित्रपट महाविद्यालयीन जीवनातील अविस्मरणीय क्षण आठवम करुन देणारा आहे. हा चित्रपट ‘थ्री इडियट’पासून प्रेरित होता. यात सुशांतसिंग राजपूत, श्रद्धा कपूर आणि वरुण शर्मा दिसले होते. जर कोणाचा दिवस चांगला गेला नसेल तर त्यांनी हा चित्रपट नक्कीच बघा.
माहितीय का? म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीबाबत कोणतं राज्य आहे आघाडीवर?
मिशन मंगल :
या यादीतील हा पाचवा चित्रपट आहे. हा चित्रपट भारतातील पहिल्या मंगळ मोहिमेची संपूर्ण प्रक्रिया दाखवतो. आपल्या पहिल्या प्रयत्नात भारताने आपले अंतराळ यान मंगळावर नेले होते. यामध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू आणि शरमन जोशी मुख्य भूमिकेत दिसले होते.