Thursday , 30 May 2024
Home मोक्कार टाईमपास Most Expensive Gifts Given by Bollywood Stars : बॉलीवूड स्टार्सने दिलेले सर्वात महागडे गिफ्ट्स.
मोक्कार टाईमपास

Most Expensive Gifts Given by Bollywood Stars : बॉलीवूड स्टार्सने दिलेले सर्वात महागडे गिफ्ट्स.

Most Expensive Gifts Given by Bollywood Stars
Most Expensive Gifts Given by Bollywood Starsr : Sillytalk

Most Expensive Gifts Given by Bollywood Stars : बॉलिवूड सेलिब्रिटींचे आयुष्य त्यांच्या चाहत्यांना नेहमीच भुरळ घालते.

आलिशान घरं, महागड्या गाड्या, ग्लॅमर… ते कुठल्यातरी दुनियेतले रहिवासी आहेत असं वाटतं. पण त्यामागे त्यांची मेहनत असते.

रात्रंदिवस हे स्टार स्वत:साठी नाव आणि संपत्ती कमावतात. या अफाट संपत्तीमुळे ते स्वत: आरामदायी जीवन जगतात.

हेही वाचा : Highest Tax paying Indian Celebrities : उच्च Tax भरणारे भारतीय सेलिब्रिटी कोणते?

त्याचप्रमाणे ते वेळोवेळी आपल्या जवळच्या लोकांवरही पैसे खर्च करताना दिसतात.

जेव्हा त्यांच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना आणि आवडत्या सहकलाकारांना भेटवस्तू देण्याचा विचार येतो तेव्हा ते खर्चाकडे पाहत नाहीत.

Most Expensive Gifts Given by Bollywood Stars : बॉलिवूडमध्ये कोणत्या स्टारने कोणाला दिले सर्वात महागडे गिफ्ट :

शाहरुखने दिली होती आलिशान कार

शाहरुख खूप उदार व्यक्ती आहे. तो त्याच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना अनमोल भेटवस्तू देण्यास मागे हटत नाही.

रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानने ‘रावण’ चित्रपटाच्या कलाकारांना 5 BMW 7 सीरीज सेडान कार गिफ्ट केल्या आहेत. यामध्ये प्रत्येक कारची किंमत एक कोटी रुपये होती.

शिल्पाला बुर्ज खलिफामध्ये घर मिळाले

महागड्या भेटवस्तूंच्या बाबतीत राज कुंद्राला विसरता येणार नाही. राज कुंद्राचा बॉलिवूडशी थेट संबंध नसला तरी त्याची पत्नी शिल्पा शेट्टी इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.

राज कुंद्रा अनेकदा शिल्पा शेट्टीला महागड्या गिफ्ट्स देऊन चर्चेत असतो.

उद्योगपती राज कुंद्रा यांनी शिल्पा शेट्टीला त्यांच्या वाढदिवसानिमित्त बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीच्या 19व्या मजल्यावर 50 कोटी रुपयांचा फ्लॅट भेट दिला होता.

याशिवाय त्याने शिल्पाला लॅम्बोर्गिनी कारही भेट दिली होती. विशेष म्हणजे ही सुपर लक्झरी कार भारतात लॉन्च झाली नसताना राजने शिल्पाला भेट दिली होती.

अभिषेकने आराध्याला बीएमडब्ल्यू मिनी कूपर दिली

अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनला संपत्तीची कमतरता नाही. बच्चन कुटुंबातील सदस्य अनेकदा एकमेकांना महागड्या भेटवस्तू देताना दिसतात.

अभिषेक बच्चनने आपली मुलगी आराध्याला तिच्या पहिल्या वाढदिवसाला 25 लाख रुपयांची BMW मिनी कूपर खरेदी केली.

करण जोहरने कतरिनाला दिली महागडी कार

करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनलेल्या ‘अग्निपथ’ चित्रपटात कतरिना कैफने ‘चिकनी चमेली’ गाण्यावर डान्स केला होता.

रिपोर्ट्सनुसार, कतरिनाने या गाण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले नाही. मात्र, करण जोहरने कतरिनाला दोन कोटींची लाल रंगाची फेरारी कार भेट दिली होती.

Related Articles

Weighty but glamorous actress
मोक्कार टाईमपास

Weighty Famous Actress : वजनदार पण ग्लॅमरस असलेल्या अभिनेत्री.

Weighty Glamorous Actress : झिरो फिगर नसलेल्या पण तरीही फॅनबेस असलेल्या वजनदार...

मोक्कार टाईमपास

Bollywood Movies : थोडं जरी बोर झालं की ‘हे’ चित्रपट आवर्जून पाहाच!

तुम्हाला फ्रेश करतील अशा काही गोष्टी घडणे अपेक्षित आहे. त्यापैकी एक गोष्ट...

Adult Web Series : मुलांना 'या' 5 वेबसिरीज कधीही पाहू देऊ नका, अन्यथा गडबड होईल…
मोक्कार टाईमपास

Adult Web Series : मुलांना ‘या’ 5 वेबसिरीज कधीही पाहू देऊ नका.

Adult Web Series : तरुणांनामध्ये क्रेझ असलेल्या वेब सिरीजमध्ये चित्रपटांपेक्षा वेगळा कंटेंट...

Raveena Tandon : किसींगसाठी नकार ते अटींचा भडीमार, रवीना टंडनची स्टाईलच वेगळी होती…
मोक्कार टाईमपास

Raveena Tandon : किसींगसाठी नकार ते अटींचा भडीमार, रवीना टंडनची स्टाईलच वेगळी होती…

Raveena Tandon : रवीना टंडन ही इंडस्ट्रीतील अशा सौंदर्यवतींपैकी एक आहे, एका...