Thursday , 30 May 2024
Home कर क्लिक Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT
Trending web series on OTT

Trending web series on OTT : तुम्ही भारतीय वेबसिरीजचे चाहते असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. आता दिवाळीच्या सुट्ट्या सुरु होतील.

तर या सुट्ट्यांमध्ये जरा हटके मजेदार, ऍक्शन, क्राईम थ्रिलर, सायकॉलॉजिकल थ्रिलर, कॉमेडी, ड्रामा किंवा एज्युकेशन सारख्या विषयावर वेबसिरीज पाहायच्या असेल पण सुचत नाहीये काय पाहावं. तर तुमच्या बुद्धीला जास्त जोर देऊ नका.

आज तुम्हाला असाच ट्रेंडिंग वेबसिरीज बद्दल माहिती देणार आहोत, ज्याने तुमची दिवाळीची सुट्टी बोरिंग न होता मनोरंजनाने भरून जाईल.

Trending web series on OTT : ओटीटीवर ट्रेंडिंग वेब सीरिज

Trending web series on OTT : “मिर्झापूर” (Mirzapur)

मिर्झापूर ही करण अंशुमन दिग्दर्शित एक क्राईमवर आधारित अ‍ॅक्शन आणि थरारक वेब सिरीज आहे.

16 नोव्हेंबर 2018 रोजी या वेब सिरीजचा पहिला सिझन (Mirzapur Seasons 1) अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) वर रिलीज झाला होता.

ह्यामध्ये मुख्य कलाकार पंकज त्रिपाठी, अली फजल, विक्रांत मस्से, दिव्येंदु शर्मा आणि श्रिया पिळगावकर हे होते. ह्यामध्ये पंकज त्रिपाठी यांची ऍक्शन विशेज गाजली होती.

Mirzapur Seasons 1 Trailer

मिर्झापूरमधील उत्तर प्रदेश बिहार भागातील गुन्हेगारीचं थरारक वास्तव “मिर्झापूर” या वेब सिरीज मधून दाखवण्यात आलं आहे.

या वेब सिरीजचा दुसरा सिझन 22 ऑक्टोबर 2020 रोजी ऍमेझॉन प्राइमवर रिलीज झाला होता. आता तिसऱ्या सिझनची शूटिंग चालू आहे असं बोललं जात आहे.

Mirzapur season 2 Trailer

“द फॅमिली मॅन” (“The Family Man”) – एक स्पाय थ्रिलर वेब सिरीज

“द फॅमिली मॅन” हे कौटुंबिक आणि हेरगिरी यांचं मिश्रण असलेली एक स्पाय थ्रिलर वेब सिरीज आहे.

ही वेबसिरीज राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी तयार केली आहे. ह्यामध्ये मनोज बाजपेयी ह्यांची श्रीकांत तिवारी नावाची भूमिका विशेष गाजली होती.

या वेबसिरीजची कथानक म्हणजे एक मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी गुप्तपणे गुप्तहेर अधिकारी म्हणून काम करण्याची कहाणी आहे.

The Family Man Seasons 1 Trailer

“द फॅमिली मॅन” सप्टेंबर 2019 मध्ये प्रीमियर व्हिडिओवर रिलीज झाली होती, रिलीज झाल्यानंतर अ‍ॅमेझॉन प्राइमवर सर्वाधिक लोकप्रिय मालिका बनली.

“द फॅमिली मॅन” अतिशय रहस्यमय स्पाय थ्रिलर वेबसिरीज आहे. याचेही दोन सिझन आहेत. दोनही सिझनला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला होता.

(The Family Man streaming on Amazon Prime Video)

The Family Man Seasons 2 Trailer

Trending web series on OTT : “कोटा फॅक्टरी” (Kota Factory) –

“कोटा फॅक्टरी” (Kota Factory) राजस्थानमधील कोटा येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित एक वास्तववादी वेब सिरीज आहे.

ह्या वेब सीरिजचे ग्दर्शन राघव सुब्बू यांनी केले होते. “कोटा फॅक्टरी” (Kota Factory) 16 एप्रिल, 2019 रोजी टीव्हीएफप्ले आणि यूट्यूबवर रिलीज करण्यात आली होती.

कोटा फॅक्टरीचे कथानक –

ही वेब सिरीजमध्ये वैभव नावाच्या सोळा वर्षाच्या विद्यार्थ्याच्या आयुष्याविषयी आहे, जो कोटा येथे गेला आहे.

Kota Factory Seasons 1 Trailer

या मालिकेत कोटा मधील विद्यार्थ्यांचे जीवन आणि आयआयटीमध्ये प्रवेश करण्यासाठी वैभव यांचे प्रयत्न दर्शविले आहेत.

ह्या सिरीजचा दुसरा सिझन 2020 मध्ये रिलीज झाला होता. यामध्येही ही कहाणी पुढे सुरू ठेवली आहे.

कोटा फॅक्ट्रीचा दुसरा सिझन नेटफ्लिक्स वर रिलीज झाला होता.

Kota Factory Seasons 2 Trailer

Related Articles

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...

Prithviraj Kapoor : The Legacy of a Theatre Icon
कर क्लिकवाच ना भो

Prithviraj Kapoor : The Legacy of a Theatre Icon पृथ्वीराज कपूर

Prithviraj Kapoor : The Legacy of a Theatre Icon : भारतीय चित्रपट...