Tuesday , 23 April 2024
Home कर क्लिक Upcoming Movies in November 2023 : नोव्हेंबर महिन्यात ‘हे’ हिंदी आणि मराठी चित्रपट होणार रिलीज.
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Upcoming Movies in November 2023 : नोव्हेंबर महिन्यात ‘हे’ हिंदी आणि मराठी चित्रपट होणार रिलीज.

Upcoming Movies in November 2023
Upcoming Movies in November 2023

Upcoming Movies in November 2023 : यंदाच्या दिवाळीमध्ये म्हणजेच या नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रेक्षकांसाठी आणि सिनेमा प्रेमींसाठी मनोरंजनाची मोठी मेजावणी असणार आहे.

कारण ह्या महिन्यामध्ये सलमान खानच्या ब्लॉकबस्टर सिनेमाला टक्कर देण्यासाठी काही मराठी चित्रपट देखील रिलीज होणार आहे.

ह्या महिन्यामध्ये सलमान खानचा टायगर 3 (Tiger 3) हा चित्रपट रिलीज होणार आहे.

त्यासोबत नाळ 2 (Naal 2), श्यामची आई (Shyamchi Aai), झिम्मा 2 (Jhimma 2) यांसारखे मराठी चित्रपट देखील रिलीज होणार आहेत.

कोणते चित्रपट कधी रिलीज होणार आहेत? जाणून घेऊयात..

Upcoming Movies in November 2023 : कोणते चित्रपट कधी रिलीज होणार?

नाळ 2 (Naal 2)

नागराज मंजुळे दिग्दर्शित नाळ चित्रपट हिट ठरल्यानंतर नाळ 2 (Naal 2) हा चित्रपट कधी रिलीज होईल याची आतुरता सिनेमा प्रेमींना लागली होती.

आता हा सिनेमा लवकरच म्हणजे येत्या 10 नोव्हेंबरला सिनेमा गृहामध्ये रिलीज होणार आहे. नाळ मधील छोट्याश्या चैत्याने अनेकांच्या मनात घर केले होते.

तसेच या सिनेमातील गाणे देखील सुपरहिट ठरले होते. आता मोठा झालेला चैत्या पाहण्यासाठी प्रेषक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

या पूर्वी नाळ 2 (Naal 2) चित्रपटाचे काही गाणे रिलीज झाले आहेत.

नाळ 2 चित्रपटाचा ट्रेलर : Naal 2 trailer

Upcoming Movies in November 2023 : टायगर 3 (Tiger 3)

सलमान खानचा एक था टायगर (Ek Tha Tiger) आणि टायगर जिंदा है (Tiger Zinda Hai) हे सिनेमे ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता टायगर 3 (Tiger 3) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच या सिनेमाच्या ऍडव्हान्स बुकिंगला देखील सुरुवात झाली आहे.

ह्या सिनेमध्ये देखील सलमान खान आणि कतरीना कैफ मुख्य भूमिकेमध्ये असणार आहे.

टायगर 3 चित्रपटाचा ट्रेलर : Tiger 3 trailer

झिम्मा 2 (Jhimma 2)

या महिन्यामध्ये आणखी एक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झिम्मा सुपरहिट ठरल्यानंतर बहुचर्चित झिम्मा 2 (Jhimma 2) लवकरच म्हणजे 24 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमा गुहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ह्या सिनेमध्ये देखील तंगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे हा सिनेमा देखील प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करेल यात शंका नाही.

झिम्मा 2 चित्रपटाचा टिझर : Jhimma 2 Teaser

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...

Prithviraj Kapoor : The Legacy of a Theatre Icon
कर क्लिकवाच ना भो

Prithviraj Kapoor : The Legacy of a Theatre Icon पृथ्वीराज कपूर

Prithviraj Kapoor : The Legacy of a Theatre Icon : भारतीय चित्रपट...