Saturday , 14 September 2024
Home वाच ना भो Non Indian Bollywood Actress : ‘या’ 7 जणी भारतात आल्या आणि अभिनेत्री बनल्या!
वाच ना भो

Non Indian Bollywood Actress : ‘या’ 7 जणी भारतात आल्या आणि अभिनेत्री बनल्या!

Bollywood Actress
Non Indian Bollywood Actress : SillyTalk

Non Indian Bollywood Actress : कॅटपासून ते नोरा फतेहीपर्यंत अनेक अभिनेत्री मूळच्या भारतीय नाही. म्हणजे त्या नॉन इंडियन आहेत.

या अभिनेत्री भारतीय नसूनही (Non Indian Bollywood Actress) त्यांनी बॉलिवूड, टॉलीवूडमध्ये आपले बस्तान मांडले आहे.

त्यातील काहींचे नाव तर आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये देखील घेतले जाते. चला, तर अभिनेत्रींच्या यादीवर एक नजर टाकूया.

Bollywood Actress
Non Indian Bollywood Actress : SillyTalk

कॅटरिना कैफ :

कॅटचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला होता. आज तिच्या नावांवर अनेक हिट चित्रपटांची यादी आहे.

असे मानले जाते की, बॉलिवूडमध्ये कॅटरिनाला सलमान खानने पाठिंबा दिल्याने तिने करिअरमध्ये मोठी मजल मारली आहे.

अभिनेता विकी कौशलसोबत लग्न करुन तिने आयुष्याच्या वेगळ्या वळणावर पाऊल ठेवले आहे. कॅटचे ग्लॅमर पाहून आजही चाहते घायाळ होतात.

जॅकलिन फर्नांडिस :

मूळ श्रीलंकेची असणाऱ्या जॅकलिनने भारतात येऊन हिंदी चित्रपटांमध्ये नशीब आजमावले. सध्याच्या घडीला जॅकलिन भारतातील मोठी अभिनेत्री बनलीय.

नोरा फतेही :

नोराचा जन्म 1992 मध्ये कॅनडामध्ये झाला. बर्‍याच वर्षांपूर्वी तिने भारतात येऊन आपले बस्तान मांडले. अखेर ‘सत्यमेव जयते’च्या ‘दिलबर-दिलबर’ या गाण्याने तिला बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवून दिली.

नर्गिस फाखरी :

ही एक अमेरिकन-पाकिस्तानी फॅशन मॉडेल तथा अभिनेत्री आहे. तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2011 च्या ‘रॉकस्टार’ या चित्रपटापासून केली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात भूमिका केल्या.

ह्याकडे लक्ष द्याल : नेटबँकिंग पासवर्डची सुरक्षितता

अ‍ॅमी जॅक्सन :

ही एक इंग्लिश मॉडेल तथा चित्रपट अभिनेत्री आहे. तिचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. 2007 मध्ये तिने मिस टीन वर्ल्ड आणि 2009 मध्ये मिस लिव्हरपूल स्पर्धा जिंकली. अक्षय कुमार, रजनीकांत यांच्यासोबत काम करणाऱ्या अ‍ॅमीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.

एली अवराम :

मॉडेल, अभिनेत्री एली ही ग्रीक वंशाची अभिनेत्री आहे, जी गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. तिने ‘मिकी व्हायरस’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसमध्ये ती स्पर्धकही राहिली आहे. तिने कॉमेडियन कपिल शर्माबरोबर देखील काम केले आहे.

एवलिन शर्मा :

अतिशय देखणी अभिनेत्री एवलिनचा जन्म जर्मनीच्या फ्रँकफर्टमध्ये झाला. बॉलिवूडमध्ये तिने ‘ये जवानी है दिवानी, यारियां’ यासारख्या हिट चित्रपटांत काम केलेले आहे.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...