Thursday , 30 May 2024
Home कर काड्या Bollywood trend : फिल्म इंडस्ट्रीमध्ये बॉडीबिल्डिंगचा ट्रेंड नक्की कोणी आणला? एकदा वाचाच…
कर काड्या

Bollywood trend : फिल्म इंडस्ट्रीमध्ये बॉडीबिल्डिंगचा ट्रेंड नक्की कोणी आणला? एकदा वाचाच…

Bollywood-Body-trend : Sillytalk.in

Bollywood trend : आजच्या घडीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, की त्यांना पाहून अनेकांना हुरुप येतो.

आज आम्ही तुम्हाला 5 अशा अभिनेत्यांविषयी सांगणार आहोत ज्यांनी बॉलीवूडमध्ये बॉडीबिल्डिंगचा ट्रेंड सुरू (Bollywood trend) केल्याचे मानले जाते.

या यादीतील तिसरे नाव सर्वांनाचा माहिती आहे. चला, तर अधिक माहितीसाठी लेख शेवटपर्यंत वाचा…

Sillytalk.in

जॉन अब्राहम :

बॉलिवूडचा हँडसम हंक म्हणून अभिनेता जॉनची ओळख आहे, त्याने 2003 मध्ये रिलीज झालेल्या ‘जिस्म’ या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअरची सुरुवात केली.

यानंतर जॉनने बॉलिवूडमधील अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले. जॉनने सुरुवातीपासूनच आपली बॉडी मेंटेन ठेवलीय.

आजही कित्येक चाहते त्याच्या बॉडीचे फॅन आहेत. त्याला फॉलो करत आहेत.

सलमान खान :

बॉलिवूडच्या दबंग खान सलमानने 1988 मध्ये रिलीज झालेल्या ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअरची सुरुवात केली.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता. तर सलमान हा संजय दत्तचा चांगला मित्र मानला जातो. अशात संजयनेच सलमानला बॉडी बनण्याचा सल्ला दिला होता.

यानंतर सलमानने आपल्या बॉडीवर मेहनत घेतली. गेल्या कित्येक वर्षांपासून सलमान त्याच्या आकर्षक बॉडीसाठी ओळखला जातो.

सनी देओल :

90 च्या दशकातला सर्वात मोठा अ‍ॅक्शन हिरो असलेल्या सनीने आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरूवात ‘बेताब’ या चित्रपटाने केली. सनीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. सनीचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट म्हणजे ‘घायल’. यासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कार तसेच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या यादीमध्ये सनीचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे कारण सुरुवातीपासूनच सनीचे शरीर आकर्षक होते. लवकरच सनीचा गदर-2 चित्रपट देखील येणार आहे.

फायद्याचं वाचा : ‘या’ ठिकाणी मिळतात सर्वात स्वस्त औषधे, नक्की लाभ घ्या

संजय दत्त :

अभिनेत संजयचा ‘रॉकी’ हा पहिला चित्रपट होता, जो 1981 मध्ये प्रदर्शित झाला होता. दारा सिंहनंतर संजय दत्तनेच चित्रपटांमध्ये बॉडी बनवण्याची प्रथा सुरू केली. लोकांना त्याची बॉडी खूप भावली. पुढे संजयनेच अनेक अभिनेत्यांना जिममध्ये जाण्यासाठी प्रेरित केले.

दारा सिंग :

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये दारा सिंह हे नाव कुस्तीपटू आणि अभिनेता म्हणून ओळखले जाते. दारा सिंग हा पहिला अभिनेता मानला जातो, ज्याने बॉलीवूडमध्ये बॉडी बनवण्याच्या ट्रेंडची सुरुवात केल्याचे मानले जाते.

Related Articles

Abhijeet Bhattacharya : Romantic Voice of Bollywood
कर काड्यावाच ना भो

Abhijeet Bhattacharya : Romantic Voice of Bollywood : अभिजीत भट्टाचार्य

Abhijeet Bhattacharya : Romantic Voice of Bollywood : बॉलिवूडमधील 90 च्या दशकानंतरचा...

Hema Malini Dream Girl of Bollywood : Happy Birthday Hema Malini
कर काड्यावाच ना भो

Hema Malini Dream Girl of Bollywood : बॉलीवूडचे कालातीत सौंदर्य – हेमा मालिनी

Hema Malini Dream Girl of Bollywood : अभिनयाच्या तसेच सौंदर्याच्या प्रतिभेने मन...

The Unfolding Drama
कर काड्यावाच ना भो

The Unfolding Drama : बॉलिवूडमधील राजकीय चित्रपट.

The Unfolding Drama : बॉलिवूडमधील राजकीय चित्रपट (Political films in Bollywood) कोणते?...