Sunday , 15 September 2024
Home कर काड्या Hema Malini Dream Girl of Bollywood : बॉलीवूडचे कालातीत सौंदर्य – हेमा मालिनी
कर काड्यावाच ना भो

Hema Malini Dream Girl of Bollywood : बॉलीवूडचे कालातीत सौंदर्य – हेमा मालिनी

Hema Malini Dream Girl of Bollywood : Happy Birthday Hema Malini
Hema Malini Dream Girl of Bollywood

Hema Malini Dream Girl of Bollywood : बॉलीवूडच्या सतत विकसित होत असलेल्या जगात, काळाच्या कसोटीवर उभे राहणारे, रसिकांच्या निखळ प्रेमाने आणि अभिनयाच्या तसेच सौंदर्याच्या प्रतिभेने हृदय आणि मन मोहून घेणारी अशीच एक सदाबहार अभिनेत्री म्हणजे हेमा मालिनी.

पाच दशकांहून अधिक मोठा काळ आपल्या सौंदर्याचा ठसा त्यांनी बॉलिवूडवर उमटवलेला आहे.

Hema Malini Dream Girl of Bollywood : भारतीय चित्रपटांची “ड्रीम गर्ल” – हेमा मालिनी

भारतीय चित्रपटांची “ड्रीम गर्ल” म्हणून ओळखल्या जाणार्‍या हेमा मालिनी यांनी 1968 मध्ये “सपनो का सौदागर” या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले.

अलौकिक सौंदर्य आणि नृत्य कौशल्ये यांनी त्यांना पटकन प्रसिद्धी दिली. “शोले” आणि “सीता और गीता” सारख्या चित्रपटांमध्ये असलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले.

Hema Malini Dream Girl of Bollywood : हेमा मालिनी एक उत्कृष्ट नृत्यांगना –

एक अष्टपैलू अभिनेत्री असण्यासोबतच, हेमा मालिनी (Hema Malini) ह्या एक उत्कृष्ट नृत्यांगना आणि कोरिओग्राफर आहेत.

शास्त्रीय नृत्य प्रकारातील त्यांच्या कौशल्याने त्यांना जगभरात प्रशंसा मिळवून दिली आहे.

हेही वाचा : Oscar : ऑस्कर विजेत्यांना नक्की काय-काय मिळते?

त्यांच्या नाट्यविहार ह्या कलाकेंद्रामार्फत भारतीय शास्त्रीय नृत्याचा प्रचार आणि प्रशिक्षण त्या अनेक वर्षे देत आहेत.

Member of Parliament : लोकसभेच्या खासदार

एवढे सगळे असूनही ह्या ज्येष्ठ अभिनेत्री मथुराचे प्रतिनिधित्व देखील करतात. भाजपच्या मथुरा लोकसभेच्या त्या खासदार देखील आहेत.

आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक उपक्रम तेथे त्यांनी हाती घेतले आहेत.

हेमा मालिनी यांचे आकर्षण आणि प्रतिभा दिवसेंदिवस वाढत जाणारे आहे. भारतीय चित्रपट आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे.

खाजगी आयुष्याबद्दल जरी त्या मौन बाळगत असल्या तरी बॉलिवूडचा ओरिजिनल माचो मॅन हि-मॅन असलेल्या धर्मेंद्र सोबत त्यांचा संसार चांगला चालला.

त्यांच्या दोन्ही मुली त्यांच्या नृत्य कला अकादमीच्या प्रसारात त्यांची मदत करतात.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...