Thursday , 30 May 2024
Home कर क्लिक Trisha Krishnan : प्रेमात वारंवार अपयशी, पण करिअरमध्ये यशस्वी… साउथ सुंदरी त्रिशाचा रंजक प्रवास!
कर क्लिक

Trisha Krishnan : प्रेमात वारंवार अपयशी, पण करिअरमध्ये यशस्वी… साउथ सुंदरी त्रिशाचा रंजक प्रवास!

SillyTalk

Trisha Krishnan : लोकप्रिय दाक्षिणात्य त्रिशा कृष्णनला तुम्ही अक्षय कुमारबरोबर ‘खट्टा मीठा’ चित्रपटात पाहिले असेलच.

SillyTalk

याच चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने ती आजही लाखो हृदयांवर राज्य करते.

टॉलीवूडमध्ये अधिराज्य करणाऱ्या त्रिशाच्या चित्रपटाच्या प्रवासाविषयी अनेक रंजक गोष्टी आहेत, आजच्या लेखामध्ये जाणून घेऊयात…

त्रिशाचा (Trisha Krishnan) जन्म चेन्नईमध्ये झाला. तिला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं, तरिही तिने अभ्यासालाही महत्त्व द्यायचे सोडले नाही.

तिने चेन्नईच्या इतिराज कॉलेज फॉर वुमन येथे ‘बिजनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’चा अभ्यास पूर्ण केला. तथापि, बिजनेसऐवजी तिला क्रिमिनल सायकोलॉजीचा अभ्यास करायचा होता.
 
1999 मध्ये वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी त्रिशाने ‘मिस मद्रास’ पुरस्कार पटकावला. याशिवाय तिने अनेक सौंदर्य स्पर्धा देखील जिंकल्या.

तिने ‘ब्यूटीफुल स्माईल अ‍ॅवार्ड’ जिंकला. पुढे 2001 मध्ये मिस इंडिया स्पर्धेतही भाग घेतला होता, मात्र यात तिला अपयश आलं. मात्र, त्यानंतर ती खऱ्या अर्थाने अनेक दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांच्या नजरेत आली.

त्रिशाने शालेय काळात ‘लीजा लीजा’ या तमिळ चित्रपटात काम केले. त्यावेळी तिचे वय होते अवघे 17 वर्ष. येथूनच त्रिशाच्या अभिनयाची सुरुवात झाली.

अभिनयामुळे त्रिशा आपला बहुतेक वेळ शाळेऐवजी सेटवर घालवावा लागत. मात्र यादरम्यान तिने अभ्यास आणि अभिनय या दोन्ही गोष्टी सांभाळल्या. ‘मिस इंडिया कॉन्टेस्ट’ मध्ये भाग घेतल्यानंतर ती फाल्गुनी पाठकच्या ‘मेरी चूनर उड़ उड़ जाए’ गाण्यात देखील दिसली होती.

त्रिशाने तिच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत अनेक दक्षिण फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. याशिवाय तिने नंदी पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय दक्षिण चित्रपट पुरस्कारही जिंकला.

हे वाचा : Financial Tech -जो बदला नहीं वह टिका नहीं

त्रिशा तिच्या लव्हलाईफमुळे नेहमीच चर्चेत राहिली. यातील दोन प्रकरणे विशेष गाजली. टॉलीवूडचा सर्वात प्रसिद्ध अभिनेता विजयबरोबरचे प्रेम जडले होते,

त्यावेळी त्याचे लग्न झालेले होते. दोघे बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये राहिले पण नंतर ते वेगळे झाले. यानंतर ती अभिनेता राणा डग्गुबाती याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती.

मात्र त्यांचेही लवकरच ब्रेकअप झाले. अखेर त्रिशाने एका व्यावसायिकाशी लग्न केले. असे वाटले आता तिचा संसार व्यवस्थित होईल.

पण तसे होऊ शकले नाही आणि त्रिशा त्या व्यावसायिकाशी संबंध तोडले. त्रिशा ‘पेट्टा’ची गुडविल अँबेसिडर आहेत. यामुळे तिने आपल्या चाहत्यांना आणि इतरांना कुत्रा पाळण्याचे आवाहन देखील केले होते.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...