Saturday , 14 September 2024
Home मोक्कार टाईमपास Karina and Shahid Kapoor Love Story : करीनाच्या प्रेमात पडायला शाहिदला 2 महिने लागले, तरीही प्रेम अपूर्ण राहिले…
मोक्कार टाईमपास

Karina and Shahid Kapoor Love Story : करीनाच्या प्रेमात पडायला शाहिदला 2 महिने लागले, तरीही प्रेम अपूर्ण राहिले…

Karina and Shahid Kapoor Love Story
Karina and Shahid Kapoor Love Story Sillytalk

Karina and Shahid Kapoor Love Story : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक बिघडलेल्या नात्याची कहाणी ऐकायला मिळते. प्रथम प्रेम, नंतर करार आणि त्यानंतर संघर्ष आहे.

अनेक स्टार्स याविषयी बोलणे टाळत असले तरी काही स्टार्स असे आहेत जे त्यांच्या नात्याबद्दल आणि ब्रेकअपच्या दुखाविषयी मोकळेपणाने बोलताना दिसतात.

असाच एक किस्सा शाहिद कपूर आणि करीना कपूरचा आहे.

Karina and Shahid Kapoor Love Story

शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. दोघांनीही हे नातं जाहीरपणे स्वीकारलं होतं.

पण हे नाते का तुटले? याचे कारण आजतागायत स्पष्ट झालेले नाही.

आज आम्ही तुम्हाला या दोघांमध्ये प्रेम कसे फुलले (Karina and Shahid Kapoor Love Story) आणि नंतर त्याचा दुःखद अंत कसा झाला? हे समजून घेऊयात…

2004 मध्ये फिदा हा चित्रपट आला होता, असे म्हटले जाते की, दोघेही याच सेटवर पहिल्यांदा भेटले होते.

फिदा हा शाहिदचा डेब्यू चित्रपट आहे. त्यावेळी करीना बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होती.

एवढे सगळे असूनही करिनानेच शाहिद कपूरला सर्वप्रथम प्रपोज केले होते.

एका मुलाखतीत करिनाने स्वत: कबूल केले की, अनेक फोन कॉल्स आणि मेसेजनंतर शाहिदने तिचा प्रस्ताव स्वीकारला होता.

करिनाबद्दल असंही म्हटलं जातं की, ती शाहिदसाठी वेडी होती आणि दोन महिने सतत त्याला फॉलो करत होती, त्यानंतर त्याने होकार दिला.

हेही वाचा : सशस्त्र सीमा बलात 1 हजार 646 जागांवर भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

2007 मध्ये दोघेही करण जोहरच्या शोमध्ये पोहोचले होते, त्यानंतर करणने करीनाला या प्रस्तावाबाबत प्रश्नही केला होता.

असे म्हटले जाते की, दोघेही एकमेकांबद्दल खूप गंभीर होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांच्या लग्नाचीही चर्चा झाली होती.

पण जेव्हा दोघेही जब वी मेटचे शूटिंग करत होते, तेव्हा करीना कपूरने टशन हा चित्रपट साइन केला आणि इथे त्यांच्या प्रेमात एक ट्विस्ट आला.

2006 मध्ये ‘जब वी मेट’चे शूटिंग सुरू होण्यापूर्वी दोघांमध्ये सर्व काही ठीक होते, पण शूटिंग संपेपर्यंत दोघांमध्ये विभक्त झाले होते.

लोकांचे म्हणणे आहे की, सेटवर त्यांच्यातील संवाद कमी होऊ लागला होता. शेवटचा सीन शूट करण्यासाठी दोघे जेव्हा सेटवर आले तेव्हा वेगवेगळ्या वाहनांतून आले.

तरीही लोक फक्त अंदाज बांधत होते. शाहिदची अमृता रावशी असलेली जवळीक हे वेगळे होण्याचे कारण असल्याचे बोलले जात होते.

त्याचवेळी करिनाची सैफसोबतची जवळीक वाढत होती. 2007 मध्ये लॅक्मे फॅशन वीकमध्ये करीना सैफसोबत दिसली तेव्हा त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. इथून दोघांची प्रेमकहाणी संपुष्टात आली.

Related Articles

Weighty but glamorous actress
मोक्कार टाईमपास

Weighty Famous Actress : वजनदार पण ग्लॅमरस असलेल्या अभिनेत्री.

Weighty Glamorous Actress : झिरो फिगर नसलेल्या पण तरीही फॅनबेस असलेल्या वजनदार...

मोक्कार टाईमपास

Bollywood Movies : थोडं जरी बोर झालं की ‘हे’ चित्रपट आवर्जून पाहाच!

तुम्हाला फ्रेश करतील अशा काही गोष्टी घडणे अपेक्षित आहे. त्यापैकी एक गोष्ट...

Adult Web Series : मुलांना 'या' 5 वेबसिरीज कधीही पाहू देऊ नका, अन्यथा गडबड होईल…
मोक्कार टाईमपास

Adult Web Series : मुलांना ‘या’ 5 वेबसिरीज कधीही पाहू देऊ नका.

Adult Web Series : तरुणांनामध्ये क्रेझ असलेल्या वेब सिरीजमध्ये चित्रपटांपेक्षा वेगळा कंटेंट...

Raveena Tandon : किसींगसाठी नकार ते अटींचा भडीमार, रवीना टंडनची स्टाईलच वेगळी होती…
मोक्कार टाईमपास

Raveena Tandon : किसींगसाठी नकार ते अटींचा भडीमार, रवीना टंडनची स्टाईलच वेगळी होती…

Raveena Tandon : रवीना टंडन ही इंडस्ट्रीतील अशा सौंदर्यवतींपैकी एक आहे, एका...