Saturday , 27 July 2024
Home मोक्कार टाईमपास Mud-Mud Ke Na Dekh : ‘मुड मुड के ना देख’ गाणं कसं रचलं गेलं? रंजक कथा वाचाच.
मोक्कार टाईमपास

Mud-Mud Ke Na Dekh : ‘मुड मुड के ना देख’ गाणं कसं रचलं गेलं? रंजक कथा वाचाच.

Mud-Mud Ke Na Dekh : 'मुड मुड के ना देख' गाणं कसं रचलं गेलं? रंजक कथा वाचाच…
Mud-Mud Ke Na Dekh : Sillytalk

Mud-Mud Ke Na Dekh : कोणत्याही चित्रपटात गाणी खूप महत्त्वाची असतात. गाण्यांचा हिट चित्रपटाच्या यशात भर घालतो.

यामुळेच प्रत्येक चित्रपट निर्माता संगीताकडे विशेष लक्ष देतो. बॉलीवूडमध्ये असे अनेक संगीतकार झाले आहेत, ज्यांनी आपल्या सूर आणि गीतांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.

संगीतकारांना गाणी रचणे सोपे नसते, त्यासाठी ते रात्रंदिवस एक करतात. चालताना, झोपताना ते फक्त नवनिर्मितीची तयारी करत राहतात.

1955 मध्ये आलेल्या राज कपूरच्या ‘श्री 420’ या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम लाभले आणि त्यातील गाणीही हिट झाली.

चित्रपटातील ‘मुड मुड के ना देख’ या गाण्याच्या निर्मितीमागे एक खास रंजक कथा आहे.

Mud-Mud Ke Na Dekh : ‘या’ गाण्याची कथा

राज कपूर दिग्दर्शित ‘श्री 420’ या चित्रपटात त्यांच्यासोबत नर्गिस आणि नादिरा महत्त्वाच्या भूमिकेत होत्या.

हा चित्रपट त्या वर्षातील सुपरहिट आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील गाण्यांनीही लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. चित्रपटातील प्रत्येक गाणे खास होते आणि आजही ते हिट आहेत.

हेही वाचा : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

‘श्री 420’चे संगीत शंकर-जयकिशन यांनी दिले होते. चित्रपटातील ‘मु़ड मुड के ना देख’ (Mud Mud Ke Na Dekh) हे गाणे आशा भोसले आणि मन्ना डे यांनी गायले होते.

नादिरा, राज कपूर आणि नर्गिस यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याच्या निर्मितीमागील कथा खूपच रंजक आहे.

एकदा राज कपूर गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर जयकिशन यांच्यासोबत लोणावळ्याला जात होते.

यादरम्यान जयकिशनला वाटेत एक सुंदर हसीना दिसली. त्या सौंदर्याने प्रभावित होऊन जयकिशन तिला पाहण्यासाठी कारमधून वारंवार वळण्याचा प्रयत्न करत होता.

त्याच क्षणी शेजारी बसलेला शैलेंद्र चिडवत म्हणाला, ‘मु़ड मुड के ना देख’ इतकंच, मग काय होतं, या ओळी जमल्या आणि मग शैलेंद्रने त्याचं गाण्यात रूपांतर केलं होत.

राज कपूर यांनी खास ‘श्री 420’मध्ये हे गाणे समाविष्ट केले. या चित्रपटातील सर्व गाणी त्यावेळी प्रचंड हिट झाली होती.

यामध्ये ‘प्यार हुआ इकरार हुआ’, ‘मेरा जुता है जपानी’, ‘दिल का हाल सुने दिलवाला’, ‘इचक दाना बीचक दाना’ आदींचा समावेश आहे…

Related Articles

Weighty but glamorous actress
मोक्कार टाईमपास

Weighty Famous Actress : वजनदार पण ग्लॅमरस असलेल्या अभिनेत्री.

Weighty Glamorous Actress : झिरो फिगर नसलेल्या पण तरीही फॅनबेस असलेल्या वजनदार...

मोक्कार टाईमपास

Bollywood Movies : थोडं जरी बोर झालं की ‘हे’ चित्रपट आवर्जून पाहाच!

तुम्हाला फ्रेश करतील अशा काही गोष्टी घडणे अपेक्षित आहे. त्यापैकी एक गोष्ट...

Adult Web Series : मुलांना 'या' 5 वेबसिरीज कधीही पाहू देऊ नका, अन्यथा गडबड होईल…
मोक्कार टाईमपास

Adult Web Series : मुलांना ‘या’ 5 वेबसिरीज कधीही पाहू देऊ नका.

Adult Web Series : तरुणांनामध्ये क्रेझ असलेल्या वेब सिरीजमध्ये चित्रपटांपेक्षा वेगळा कंटेंट...

Raveena Tandon : किसींगसाठी नकार ते अटींचा भडीमार, रवीना टंडनची स्टाईलच वेगळी होती…
मोक्कार टाईमपास

Raveena Tandon : किसींगसाठी नकार ते अटींचा भडीमार, रवीना टंडनची स्टाईलच वेगळी होती…

Raveena Tandon : रवीना टंडन ही इंडस्ट्रीतील अशा सौंदर्यवतींपैकी एक आहे, एका...