Hema Malini : हिंदी चित्रपटसृष्टीतील हीमन आणि ड्रीम गर्ल धर्मेंद्र-हेमा मालिनी यांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे.
पत्नी आणि मुले असूनही धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत दुसरे लग्न केले. हेमा मालिनी यांच्या सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागले होते.
Hema Malini : हेमा मालिनींचे पहिले प्रेम धर्मेंद्र नव्हते…
त्यापैकी एक दिग्गज अभिनेते संजीव कुमार देखील होते. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांना लग्न करायचे होते. मात्र एका अटीमुळे हेमा मालिनी आणि ते वेगळे झाले.
धर्मेंद्र यांच्या सोबत लग्न करण्याआधी हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्या नात्याची चर्चा चित्रपटसृष्टीतील कॉरिडॉरमध्ये होती.
हेमा मालिनींची Love Story
‘सीता और गीता’ चित्रपटादरम्यान दोघे खूप जवळ आले होते. संजीव कुमार यांना हेमा मालिनीसोबत लग्न करायचे होते.
संजीव कुमार यांच्या आईला ही बाब कळताच त्या हेमा मालिनी यांना त्यांच्या घरी भेटायला गेल्या. पण लग्नानंतर काम करणार नाही, अशी सून त्यांना हवी होती.
संजीव कुमार यांनी हेमाला सांगितले होते की, लग्नानंतर तिला काम सोडून आईसोबत घरी राहावे लागेल आणि तिची काळजी घ्यावी लागेल.
ही अट हेमाला मान्य नव्हती आणि इथूनच त्यांच्या नात्यात दुरावा आला. संजीव कुमारसोबत ब्रेकअप झाल्यानंतर हेमा मालिनी शांत-शांत होत्या.
Hema Malini : असं जुळलं धर्मेंद्र यांच्या सोबत नातं
त्यानंतर त्यांना ‘तू हसीन मैं जवान’ चित्रपटाची ऑफर आली आणि धर्मेंद्रची त्यांच्यासोबत भेट झाली.
हेमा मालिनी यांच्या आईची इच्छा होती की त्यांच्या मुलीने धर्मेंद्र यांच्याशी बोलावे. कारण तिला माहित होते की धर्मेंद्र विवाहित आहे.
त्यामुळे आपल्या मुलीमध्ये काहीही होऊ शकत नाही. पण तसं झालं नाही, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र एकमेकांच्या जवळ आले.
दोघांची जोडीही हिट होऊ लागली, प्रेक्षकांना त्यांना चित्रपटांमध्ये एकत्र पाहणे आवडले. अशा परिस्थितीत त्यांनी बॅक टू बॅक चित्रपट एकत्र करायला सुरुवात केली.
हेमाच्या घरच्यांनाही हे समजू लागले होते. तो हेमावर लक्ष ठेवू लागला. त्यानंतर एक वेळ अशी आली जेव्हा दोघांनी एकत्र ‘शोले’ चित्रपट केला.
यादरम्यान त्यांनी आपले प्रेम व्यक्त केले आणि चित्रपट संपताच लग्न केले.
Hema Malini : हे प्रसिद्ध कपल कोणत्या कारणामुळे दुरावले?
लेखक हनीफ जावेरी आणि सुमंत बत्रा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात संजीव आणि हेमामालिनी यांच्याबद्दल लिहिलेलं आहे.
हे प्रसिद्ध कपल कोणत्या कारणामुळे दुरावले? याचेही कारणं त्यात देण्यात आले आहेत. त्यात लिहिलंय की ‘संजीव आणि हेमामालिनी एका चित्रपटात गाण्याची शूटिंग करत होते.
तेव्हा अचानक अपघात झाला आणि दोघांनाही जखमा झाल्या होत्या. त्यावेळीच ते दोघे एकत्र आले.
दोघांना एकमेकांसोबत खुश पाहुन संजीव यांच्या आईने दोघांच्या लग्नासाठी मंजूरीही दिली होती.
हेमामालिनीही या संजीव यांच्या आईंचा फार आदर करायच्या. परंतु 1991 मध्ये दिलेल्या एका मुलखातील हेमामालिनी यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं.
त्यांनी म्हटलं होतं की ‘संजीव यांना आईची सेवा करणारी एक विनम्र असलेली पत्नी हवी होती जी मी कधीही असू शकणार नाही, त्यांना माझ्याशी लग्न करायचं होतं’.
या कारणांमुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्याचबरोबर सुलक्षणा पंडित ही संजीव यांना पसंत करत होत्या.
परंतु पहिला प्रेमभंग झाल्यानंतर संजीव आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांचं 1985 साली अवघ्या 47 व्या वर्षी निधन झालं होतं.