Hindustani Bhau : सोशल मीडियावर ‘हिंदुस्थानी भाऊ’ हे एक प्रसिद्ध आणि चर्चित नाव आहे. मात्र तो नक्की कसा प्रसिद्ध झाला? त्याने नक्की कधी आणि कुठून सुरुवात केली होती? यासह अनेक पडद्या मागील बाबींवर आजच्या लेखामध्ये जाणून घेऊयात…
‘हिंदुस्थानी भाऊ’चे (Hindustani Bhau) खरे नाव ‘विकास जयराम पाठक’ असे आहे.
विकास हा ‘हिंदुस्तानी भाऊ’ या नावाने टिकटॉक, यूट्युब आणि फेसबुकवर कमालीचा प्रसिद्ध आहे.
तो सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांची आपल्या खास शैलीत फिरकी घेण्यासाठी ओळखला जातो.
मराठमोळा बबलू उर्फ विकास जयराम पाठक हा जन्मतः मुंबईकर आहे. तो आई-वडील, पत्नी आणि मुलगा आदित्य यांच्यासह मुंबईत राहतो.
लहान वयातच त्याच्यावर घरची जबाबदारी पडली. यामुळे त्याचे शिक्षण सातवीपर्यंतच झाले. त्याने सुरुवातीच्या काळात खार जिमखान्यात 20 रुपये प्रतिदिन म्हणून बॉलबॉयची पहिली नोकरी केली होती.
पुढे त्याने चायनीजच्या गाडीवर तसेच बारमध्ये वेटर म्हणून काम केले. लोकलमध्ये आणि दारोदार जाऊन अगरबत्त्या देखील विकल्या.
हे ही वाचा : कर्ज काढून सण साजरे करताय..? सावधान..तुमच्यावर लक्ष आहे
Hindustani Bhau : Big Boss Participant
पुलवामा हल्ल्यानंतर भारताविषयी बोलणाऱ्यांवर त्याने एक व्हिडीओ बनवला होता. यानंतर विकासचं नामकरण ‘हिंदुस्थानी भाऊ’ असे झाले. त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. तो ‘बिग बॉस’च्या (Indian Big Boss Participant) तेराव्या पर्वात देखील दिसला होता. आपल्या बेधडक स्वभाव आणि बिनधास्त बोलण्याच्या शैलीमुळे तो सहस्पर्धकांच्याही पसंतीस उतरला होता. ‘हिंदुस्थानी भाऊ’ला मीमच्या जगात खूप पसंत केले जाते. सोशल मीडियावर आपल्याला भाऊशी संबंधित अनेक मेम्स आढळतील. राजकीय असो की सामाजिक प्रत्यके विषयावर एखादा व्हिडीओ करून सतत चर्चेत राहणारे हे व्यक्तिमत्व आहे. सोशल मीडियाने अनेकांना रात्रीत स्टार केलं. हिंदुस्थानी भाऊ त्यातलाच एक आहे.
मराठमोळ्या विकासची स्टोरी तुम्हाला कशी वाटली? आम्हाला नक्की कळवा. तसेच असेच नव-नवीन इंटरेस्टिंग लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा.