Tuesday , 23 April 2024
Home वाच ना भो Best Films : ‘हे’ चित्रपट कमी वेळात तयार झाले, पण मोक्कार धुमाकूळ घातला…
वाच ना भो

Best Films : ‘हे’ चित्रपट कमी वेळात तयार झाले, पण मोक्कार धुमाकूळ घातला…

Best Film : silly talk

Best Films : मराठी, हिंदी असो की टॉलीवूड, हॉलीवूड दररोज अनेक चित्रपटांचे चित्रीकरण केले जाते.

तसे पाहायला गेले तर चित्रपट बनण्यासाठी अनेक महिने लागतात, परंतु काही चित्रपट तयार करण्यासाठी खूप कमी वेळ लागलाय.

काही चित्रपट 10 दिवसांत तर काही 30 दिवसांत तयार झाले आहेत. एवढ्या कमी वेळात बनवलेल्या या चित्रपटांचे काय झाले असेल? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल.

तर आम्ही तुम्हाला सांगतो की, कमी कालावधीत बनलेल्या या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ (Best Films) घातला.

चला, तर अशाच काही चित्रपटांवर नजर टाकूयात…

Best Film : silly talk

Best Films : गॅसलाईट

सारा अली खान, विक्रांत मॅसी आणि चित्रांगदा सिंग अभिनित ‘गॅसलाईट’ हा चित्रपट 31 मार्च रोजी डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.

या चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडला आहे. हा चित्रपटही जबरदस्त असणार आहे, अशी अपेक्षा आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? की हा चित्रपट अवघ्या 36 दिवसांत पूर्ण झालाय.

हेही वाचा : Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांसाठी भरती सुरु.

धमाका

तुम्हाला कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ चित्रपट आठवतोय का? तर हा चित्रपट कोरोनाच्या काळात शूट करण्यात आला होता.

आतापर्यंतच्या सर्वात कमी दिवसात शूट केलेल्या चित्रपटांमध्ये हा चित्रपट अव्वल आहे.

चित्रपटाच्या शूटिंगसाठी फक्त 10 दिवस लागले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर माधवनने केले होते.

‘हरामखोर

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि श्वेता त्रिपाठी यांचा ‘हरामखोर’ नावाचा चित्रपट आला होता.

यात शिक्षक आणि विद्यार्थ्याची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट अवघ्या 16 दिवसांत पूर्ण झाला होता.

तनु वेड्स मनु रिटर्न्स

‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ हा सुपरहिट चित्रपट ठरला होता. त्याचे शूटिंग अवघ्या 30 दिवसांत पूर्ण झाल्याचे बोलले जाते.

कंगना राणौत आणि आर माधवन अभिनित या चित्रपटाला लोकांचे खूप प्रेम मिळाले.

जॉली एलएलबी 2

‘जॉली एलएलबी 2’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. अक्षय कुमार आणि हुमा कुरेशी अभिनिक चित्रपटही फार कमी वेळात तयार झाला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या शूटिंगला फक्त 1 महिना लागला होता.

हाऊसफुल 3

अक्षय कुमार एका वर्षात चार चित्रपट करतो. त्याचा ‘हाऊसफुल 3’ हा चित्रपट आला होता, ज्यामध्ये अक्षयसोबत रितेश देशमुख आणि राजकुमार रावही दिसले होते.

हा चित्रपट बनवण्यासाठी केवळ 38 दिवस लागले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली.

बरेली की बर्फी

‘बरेली की बर्फी’चे शूटिंग केवळ 2 महिन्यांत पूर्ण झाले होते. राजकुमार राव, कृती सेनन आणि आयुष्मान खुराना अभिनित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

मुक्काबाज

जिमी शेरगिल आणि विनीत कुमार सिंग यांनी ‘मुक्काबाज’ चित्रपट बनवण्यासाठी फार कमी वेळ घेतला होता. अनुराग कश्यपचा हा चित्रपट 2017 साली बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...