Bollywood Stars Arrange Marriage : बॉलीवूडमध्ये लव्ह मॅरेजचा मोठा ट्रेंड पाहायला मिळतो.
मात्रबॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी पालकांच्या पसंतीच्या मुलींसोबत अरेंज केलं आहे. (Bollywood Stars Arrange Marriage)
या यादीत एक-दोन नव्हे तर अनेक सेलिब्रिटी आहेत. त्याबाबत या लेखामध्ये जाणून घेऊयात…
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत :
या दोघांनी 2015 मध्ये लग्न केले. दोघांच्या कुटुंबीयांनी ही जोडी निवडली. सध्या दोघांनाही दोन मुलं आहेत.
मीरा बी-टाऊनची नाही. तर लग्नाआधी शाहिदचे करिनासोबत अफेअर असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या.
हेही वाचा : Indian Car Industry : भारतीय कार उद्योगातील प्रमुख टप्पे आणि घडामोडींचे विहंगावलोकन.
प्रियांका आणि विवेक ओबेरॉय :
प्रियांका आणि विवेक ओबेरॉय या दोघांनी 2010 मध्ये अरेंज मॅरेज केले होते.
विवेकने मुलाखतींमध्ये पत्नी प्रियांकाची अनेकदा स्तुती केली आहे आणि प्रियांकाच्या आयुष्यात आल्यानंतर त्याला पूर्ण वाटत असल्याचे सांगितले. प्रियांकाशी लग्न करण्यापूर्वी विवेक ओबेरॉयने ऐश्वर्या रायला डेट केले होते.
नील नितीन मुकेश :
यानेही लव्ह ऐवजी अरेंज मॅरेजला महत्त्व दिले. 9 फेब्रुवारी 2017 रोजी त्याने रुक्मिणीशी लग्न केले. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. नील नितीन मुकेश आणि रुक्मिणीचा विवाह उदयपूरमध्ये झाला होता.
माधुरी दीक्षित :
तिने तिचं करिअर शिखरावर असताना लग्न करण्याचा निर्णय घेतला. माधुरीसाठी तिला मिस्टर परफेक्ट शोधण्याचे काम तिच्या भावाने केले होते.
जेव्हा तिचा संजय दत्तसोबत ब्रेकअप झाला तेव्हा ती खूप दुःखी होती. दरम्यान श्रीराम नेने यांची भेट तिने घेतली होती. त्यानंतर दोघांनीही घरच्यांच्या इच्छेनुसार लग्न केले.
करिश्मा कपूर :
अभिषेक बच्चन सोबतचे लग्न मोडल्यानंतर करिश्माने संजय कपूरसोबत अरेंज मॅरेज केले, पण नंतर त्यांचे लग्न मोडले.
आता करिश्मा आपल्या मुलांसह मुंबईत राहते. करिश्मा ही संजय कपूरची दुसरी पत्नी होती.
राज कपूर आणि कृष्णा राज कपूर :
या दोघांचा विवाह 1946 मध्ये मध्य प्रदेशातील रीवा येथे झाला होता. त्यांच्या पहिल्या भेटीनंतर वर्षभरातच दोघांनी लग्न केले होते.
त्यावेळी राज कपूर फक्त 22 वर्षांचे होते. लग्नानंतर त्यांचे नाव नर्गिस, वैजयंतीमाला आणि झीनत अमान यांच्याशी जोडले गेले.
वैजयंतीमालासोबत नाव जोडल्यानंतर इतका वाद झाला की कृष्णाने घर सोडले, त्यानंतर त्यांनी पुन्हा वैजयंतीमालासोबत काम न करण्याची अट राज कपूरसमोर ठेवली.
त्यानंतरच ती पुन्हा घरी परतली आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवले. कृष्णा कपूर ही पृथ्वी राज कपूर यांच्या मामाची मुलगी होती.
शम्मी कपूर :
शम्मी कपूरच्या अफेअरच्या बातम्या नेहमीच चर्चेत असायच्या. तो गीता बालीसोबत पळून गेला होता, पण तिच्या मृत्यूनंतर शम्मी कपूरच्या कुटुंबीयांनी 1969 मध्ये नीला देवीशी शम्मी कपूरचे लग्न लावून दिले.
पिंकी आणि राकेश रोशन :
या दोघांचा विवाह 1970 मध्ये झाला होता. दोघांच्या वडिलांनी हे लग्न निश्चित केले होते. पिंकी आणि राकेश रोशनचे वडील एकमेकांचे चांगले मित्र होते. पिंकीचे वडील जे. ओमप्रकाश हे दिग्दर्शकही होते.