Investment in Startups : बॉलिवूड स्टार्स चित्रपटा व्यतिरिक्त विविध माध्यमातून कामाई करत असतात.
अनेक बॉलिवूड स्टार्संनी तर स्टार्टअप्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
या यादीत आलिया भट्ट, दीपिका पदुकोणसारख्या स्टार्सचा देखील समावेश आहे. आज अशाच काही स्टार्सची यादीनर नजर टाकूयात…
Investment in Startups : आलिया भट्ट :
आलियाने फुल डॉटको नावाच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.
जी धूप आणि खते बनवण्यासाठी फुलांचा पुनर्वापर करते. तिने स्टाईल क्रॅकरमध्येही गुंतवणूक केल्याचे सांगितले जाते.
भारतातील इन्शुरन्स इंडस्ट्री
Investment in Startups : अनुष्का शर्मा :
अनुष्का शर्माच्या नावावर केवळ प्रोडक्शन हाऊसच आहे, असे नाही तर तिने स्टार्टअपमध्येही काही गुंतवणूक केली आहे.
तिने ब्लू ट्राईब नावाच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे जी मांसाला पर्याय देते.
शिल्पा शेट्टी :
शिल्पा शेट्टी एक फिटनेस फ्रीक आहे आणि तिने फास्ट अँड अप आणि चिकन्यूट्रिक्स नावाच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे.
दीपिका पदुकोण :
दीपिकाच्या फॅशन ब्रँड व्यतिरिक्त, तिने D2C ब्रँड Nua मध्ये गुंतवणूक केली आहे.
सोनू सूद :
सोनू त्याच्या दानशूर आणि परोपकारी कार्यासाठी ओळखला जातो. पण तो एक चांगला गुंतवणूकदारही आहे.
त्याने एआय-आधारित सोशल मीडिया अॅप एक्सप्लरजरमध्ये गुंतवणूक केली आहे.
सुनील शेट्टी :
सुनील शेट्टी मोठा व्यवसायिक आहे. त्याने Aquatein नावाच्या फिटनेस स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.
मलायका अरोरा :
योगप्रेमी मलायका अरोराने कपिवा नावाच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे.
ती त्याची ब्रँड अॅम्बेसेडर आहे आणि आयुर्वेदाच्या कपिवा अकादमीमध्ये वेलनेस मेंटॉर देखील आहे.