Thursday , 30 May 2024
Home वाच ना भो South Indian Movies : दक्षिणेकडील ‘हे’ हिट चित्रपट OTT’वर हिंदीमध्ये उपलब्ध.
वाच ना भो

South Indian Movies : दक्षिणेकडील ‘हे’ हिट चित्रपट OTT’वर हिंदीमध्ये उपलब्ध.

South Indian Movies : दक्षिणेकडील 'हे' हिट चित्रपट OTT'वर हिंदीमध्ये उपलब्ध.
South Indian Movies : Sillytalk

South Indian Movies : बॉलीवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांकडे हल्ली ओढा वाढत चालल्याचे आहे.

अशात जर तुम्ही आात्तापर्यंत साऊथचे हिट चित्रपट पाहिले नसतील, तर आता तुम्ही ते तुमच्या मोबाईल फोनवरच हिंदीत पाहू शकता…

South Indian Movies : कोणते आहेत ‘हे’ सुपरहिट चित्रपट?

द घोस्ट :

दक्षिणेतील अभिनेता अक्किनेनी नागार्जुनचा चित्रपट ‘द घोस्ट’ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

यामध्ये अभिनेत्री सोनल चौहानसोबतचा त्याचा रोमान्स चांगलाच चर्चेत आला होता.

अशा परिस्थितीत, आता तुम्ही हा चित्रपट ओटीटीवर हिंदीत पाहू शकता. तुम्ही तो नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये पाहू शकता.

हेही वाचा : How To Prepare For Interview : इंटरव्यूव्हसाठी तयारी कशी कराल.??

मेजर :

दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू निर्मित ‘मेजर’ चित्रपटाचा हिंदी डब रिलीज झाला आहे. तुम्ही तो नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

हा चित्रपट मे 2022 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये अभिनेता आदिवी शेषने मुख्य भूमिका साकारली होती.

याच्या कथेत 26/11 च्या वास्तविक घटनेत शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची कहाणी दाखवण्यात आली आहे.

थुनिवू :

दक्षिणेतील अभिनेता अजित कुमारचा ‘थुनिवू’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यामध्ये अभिनेत्याने हिरो कम व्हिलनची भूमिका साकारली होती.

यामध्ये तो चोरांच्या टोळीचा म्होरक्या आहे. या चित्रपटात तुम्हाला साऊथ स्टाईलमध्ये ‘धूम’ची चव पाहायला मिळणार आहे.

पण त्याची कथा अगदी वेगळी आहे. तुम्ही तो नेटफ्लिक्सवर हिंदीत पाहू शकता.

रॉ :

यासोबतच थलपथी विजयचा ‘रॉ’ हा चित्रपट गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रिलीज झाला होता. यामध्ये अभिनेता अॅक्शन अवतारात दिसला होता.

हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. तो नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये पाहता येईल.

गॉडफादर :

चिरंजीवी आणि सलमान खान स्टारर चित्रपट ‘गॉडफादर’ ऑक्टोबर 2022 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आता तुम्ही तो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये पाहू शकता. अॅक्शनने भरलेला हा सिनेमा लोकांना डोक्यावर घेतला होता.

‘डीएसपी’ :

विजय सेतुपतीचा ‘डीएसपी’ हा चित्रपटही हिंदीत पाहता येणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तो प्रदर्शित झाला होता. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर तुम्ही हा चित्रपट हिंदीत पाहू शकता.

धमाका :

दुसरीकडे, रवी तेजाचा चित्रपट ‘धमाका’ रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर दणका केला होता. तो गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. यात अभिनेत्याचे अनेक अॅक्शन अवतार पाहायला मिळाले. हा चित्रपट तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...