Tiger Shroff : बॉलिवूडचा हँडसम हंक अभिनेता म्हणून टायगर श्रॉफची ओळख बनलीय.
दशकभरात या अभिनेत्याचे संपूर्ण देशभरात मोठे चाहते आहेत.
हिरोपंती चित्रपटातून पदार्पण करणारा अभिनेता टायगर श्रॉफ सुपरस्टार कसा झाला? त्याच्या नावापासूनचे ते यशापर्यंतचे अनेक किस्से आजच्या लेखामध्ये जाणून घेऊयात..
बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफच्या घरी जन्मलेल्या टायगर श्रॉफचे (Tiger Shroff) खरे नाव जय हेमंत श्रॉफ आहे.
हे नाव टायगरला त्याच्या वडिलांनी दिले होते. टायगरचा जन्म 2 मार्च 1990 रोजी मुंबईत झाला होता.
Tiger Shroff : टायगर नावामागील कारण काय?
जय हेमंत श्रॉफ याला त्याच्या खोडकरपणामुळे टायगर म्हटले जायचे. मीडियाशी संवाद साधताना जॅकी श्रॉफने एकदा सांगितले होते की, टायगर लहान असताना त्याला चावायची सवय होती, तो टायगरसारखा चावायचा, म्हणूनच त्याला टायगर असे नाव पडले.
हेही वाचा : Job Update : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांसाठी भरती सुरु.
अभिनयापूर्वी जपायचा हा छंद :
आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना प्रभावित करणाऱ्या टायगरची अभिनय ही पहिली पसंती कधीच नव्हती. अभिनेत्याला नेहमीच मार्शल आर्टमध्ये रस आहे आणि तो प्रशिक्षित मार्शल आर्टिस्ट आहे. टायगरने सुरुवातीला अभिनयाचा विचार केला नव्हता. मात्र त्याने मार्शल आर्ट्स, जिम्नॅस्टिक्स आणि नृत्याचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे. त्याच्या ‘हिरोपंती’ या पहिल्या चित्रपटात त्याने आपले सर्व स्टंट स्वतः केले.
ही अभिनेत्री आहे टायगरची बेस्ट फ्रेंड :
टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचे बालपण एकमेकांसोबत गेले आहे. दोन्ही कलाकार एकमेकांचे वर्गमित्रही राहिले आहेत. ‘बागी’ चित्रपटात टायगर आणि श्रद्धा स्क्रिन शेअर करताना दिसले होते.
आतापर्यंत या चित्रपटांमध्ये केले काम :
‘हीरोपंती’ चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर, टायगरने ‘बागी’, ‘बागी 2’, ‘वॉर’, ‘अ फ्लाईंग जट’ (अ फ्लाइंग जट), ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटांमध्ये दिसला होता. तसेच, आपल्या अभिनय कौशल्याने त्याने सर्वांची वाहवा मिळवली आहेत. बॉलिवूडच्या या टायगरला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात…