Sunday , 15 September 2024
Home कर क्लिक Amitabh and Jaya Bachchan : अमिताभ-जया बच्चन यांनी फुकटात केला चित्रपट, ‘जलसा’त झालं शूटिंग; सुपरहिट किस्सा…
कर क्लिक

Amitabh and Jaya Bachchan : अमिताभ-जया बच्चन यांनी फुकटात केला चित्रपट, ‘जलसा’त झालं शूटिंग; सुपरहिट किस्सा…

Amitabh and Jaya Bachchan : SillyTalk

Amitabh and Jaya Bachchan : 1975 मध्ये हृषीकेश मुखर्जी यांनी ‘चुपके चुपके’ (चुपके-चुपके) हा एक विनोदी चित्रपट आणला.

ज्याचा अमिताभ बच्चन आणि जया बच्चन (Amitabh and Jaya Bachchan) भाग होते.

या चित्रपटात त्यांच्या व्यतिरिक्त धर्मेंद्र, शर्मिला टागोर, ओम प्रकाश, उषा किरण देखील दिसले होते.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी या चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केले होते.

मात्र अमिताभ आणि जया या दोघांनीही या चित्रपटात काम करण्यासाठी कोणतेही शुल्क (मानधन) घेतले नाही. असे काय कारण होते? की त्यांनी मानधनचं घेतले नाही, आजच्या लेखामध्ये त्याबद्दल जाणून घेऊयात…

‘चुपके चुपके’ हा चित्रपट येण्यापूर्वीच अमिताभ बच्चन यांनी 1973 साली आलेल्या ‘जंजीर’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली होती.

मात्र असे असतानाही बच्चनने या चित्रपटात सहाय्यक अभिनेता होण्यास होकार दिला.

कारण हृषिकेश मुखर्जी हे जया आणि अमिताभ या दोघांचे आवडते दिग्दर्शक होते, आणि त्यांच्यासोबत काम करण्याची एकही संधी त्यांना सोडायची नव्हती.

या चित्रपटात अमिताभ-जया यांना कास्ट करण्यामागेही एक मोठे कारण होते.

हेही वाचा : How To Prepare For Interview : इंटरव्यूव्हसाठी तयारी कशी कराल.??

Amitabh and Jaya Bachchan : अमिताभ-जया यांनी दिग्दर्शकाला केली विनंती :

‘चुपके चुपके’ या चित्रपटात आधी हृषीकेश मुखर्जी यांना अमिताभ आणि जया बच्चन यांच्या भूमिकेसाठी नवीन चेहरा घ्यायचा होता. जेव्हा अमिताभ-जया यांना कळले की हृषीकेश मुखर्जी एका कॉमेडी चित्रपटाचा विचार करत आहेत, तेव्हा दोघांनीही त्यांच्याकडे संपर्क साधला आणि चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान या दिग्दर्शकाने सांगितले की, तो नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. पण दोघेही आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले आणि त्यांनी या चित्रपटासाठी कोणतेही शुल्क घेणार नसल्याचे सांगितले. मग शेवटी हृषीकेश मुखर्जीने अमिताभ आणि जया यांना या चित्रपटात कास्ट करण्याचे नक्की केले.

चित्रपटाने यशाचे झेंडे रोवले : दोघांना चित्रपटात काम मिळाले आणि ‘चुपके चुपके’ चित्रपटाने यशाचे अनेक झेंडे रोवले. आजही लोक हा कॉमेडी चित्रपट बघणे सोडत नाहीत. मात्र, आतापर्यंत या चित्रपटाचा रिमेक बनवला गेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जया बच्चन गरोदर होत्या. पण चित्रपटाचा सीन अशा प्रकारे शूट करण्यात आला की ती गर्भवती आहेत, असे कुठेच दिसत नाही. यापूर्वी अमिताभ यांनी बॉम्बे टू गोवा सारखे कॉमेडी चित्रपट देखील केले होते.

‘चुपके चुपके’ चित्रपटाला 46 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट देखील केली होती. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की चित्रपटाच्या आठवणी शेअर केल्या. यासोबत त्यांनी सांगितले की, त्यांच्या ‘जलसा’ या आलिशान बंगल्यात ‘चुपके चुपके’ चित्रपटासह अनेक हिट चित्रपटांचे शूटिंग झाले आहे.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...