Yo Yo Honey Singh : यो-यो हनी सिंगला वेगळ्या परिचयाची गरज नाही.
गेल्या काही वर्षांत त्याने जे काही काम केले आहे, ते रसिकांना खूप आवडले आहे.
दरम्यान एक वेळ अशी आली की, करिअरच्या शिखरावर आल्यानंतर हनी सिंग कुठेतरी गायब झाला होता.
अचानक हनी सिंगने स्वतःला या ग्लॅमरस दुनियेपासून काहीसे दूर केले होते. मात्र, आता त्याने असे का केले? हे उघड झाले आहे. हनी सिंगने स्वतः डिप्रेशनमध्ये असल्याचे मान्य केले.
आजकाल, तो त्याच्या आयुष्यातील या गडद टप्प्याबद्दल मोकळेपणाने बोलत आहे आणि त्याच्यासोबत घडलेल्या प्रत्येक गोष्टींचा उल्लेख करण्यात कोणतीही संकोच करताना दिसत नाही.
त्याच वेळी, आता पुन्हा एकदा गायकाने त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलताना सांगितले की काही बॉलीवूड सेलिब्रिटींनी त्याला कठीण स्थितीत कशी साथ दिली आणि त्यातून बाहेर येण्यास मदत केली.
Yo Yo Honey Singh : हनी सिंगला कोणी मदत केली?
हनी सिंगने एका मुलाखतीत सांगितले की, दीपिका पदुकोण जेव्हा काही मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होती आणि कोणत्या डॉक्टरकडे जावे, हे समजत नव्हते तेव्हा तिने त्याच्यासाठी एक डॉक्टर सुचवला होता.
Honey Singh असेही सांगितले की, अक्षय कुमारही त्याला कधी-कधी फोन करायचा. इतकंच नाही तर शाहरुख खाननेही त्यावेळी त्याला पाठिंबा दिला होता.
हनी सिंहने सांगितले की, सर्वांनी मला खूप पाठिंबा दिला, जेव्हा माझी प्रकृती खूप खराब झाली तेव्हा मला समजत नव्हते की कोणत्या डॉक्टरकडे जावे.
त्यावेळी दीपिका पदुकोणने मला खूप साथ दिली. दीपिकाला वाटले की मलाही तिच्यासारखीच समस्या आहे, माझे प्रकरण खूप गंभीर आहे.
दीपिकाने माझ्या कुटुंबीयांना डॉक्टरांचा सल्ला दिला. मी पण डॉक्टरांकडे गेलो. दीपिकाने माझ्यासाठी खूप काही केले आहे.
गायक पुढे म्हणाला, शाहरुख भाईने खूप साथ दिली, अक्षय पाजीचा फोन आला. मी फोनवरही बोललो नाही. मी 5 वर्षे फोनवर बोललो नाही,
मी 3 वर्षे टीव्ही पाहिला नाही. हनी सिंग 2014 नंतर अचानक गायब झाला होता.
पण आता त्याने अक्षय कुमारच्या आगामी ‘सेल्फी’ आणि सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये गाणे गायले आहे.
असो, अडचणीच्या काळात मदत करणाऱ्याला माणसाने विसरू नये, याची आठवणच हनी सिंगने करूनन दिली आहे.
आता खऱ्या अर्थाने हनी सिंगने परतल्याने चाहत्यांच्या त्याच्याकडच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आता तो या अपेक्षा पूर्ण करतो की नाही? हे येणारा काळच सांगेल.