Tuesday , 23 April 2024
Home हिडयो Rekha-Amitabh Bachchan First Movie : तुम्ही रेखा-अमिताभ बच्चनचा पहिला चित्रपट कधीच बघू शकणार नाही, कारण आहे रंजक…
हिडयो

Rekha-Amitabh Bachchan First Movie : तुम्ही रेखा-अमिताभ बच्चनचा पहिला चित्रपट कधीच बघू शकणार नाही, कारण आहे रंजक…

xr:d:DAFc3V9Rrws:17,j:43068817255,t:23031105

Rekha-Amitabh Bachchan First Movie : दुलाल गुहा यांच्या ‘दो अंजाने’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी पहिल्यांदा पडद्यावर दिसली होती. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. पुढे ही जोडी सर्वात यशस्वी जोडी ठरली, गाजली.

पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ‘दो अंजाने’च्या आधी 1972 मध्ये या जोडीवर चित्रपट बनायला सुरुवात झाली होती. या चित्रपटाचे सुमारे 7 रील बनवले गेले, परंतु काही परिस्थिती अशी निर्माण झाली की चित्रपट बंद झाला. बॉलीवूडमध्ये चित्रपटातील कलाकार कोणीही असला तरी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच त्याचे भवितव्य ठरते, असे म्हटले जाते. अमिताभ-रेखा यांच्या पहिल्या चित्रपटाबाबतही असेच काहीसे घडले.

एका वृत्तानुसार, चित्रपट निर्माते जीएम रोशन आणि दिग्दर्शक कुंदन कुमार यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांना पहिल्यांदा ‘अपने-पराये’ चित्रपटात कास्ट केले होते. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते पण चित्रपटाचे काही सीन शूट झाल्यानंतर चित्रपट थांबवण्यात आला होता.

अमिताभ यांना चित्रपटातून काढले : असे म्हटले जाते की, चित्रपट बनवताना निर्मात्यांसमोर आर्थिक संकट आले होते. दुसरीकडे कुंदनने अमिताभ बच्चन यांना चित्रपटातून काढून त्यांच्या जागी संजय खानला आणले आणि रेखासोबत त्यांची जोडी केली. इतकेच नाही तर चित्रपटाचे शीर्षकही चित्रपट निर्मात्याने बदलून ‘दुनिया का मेला’ असे केले. यानंतर 1973 मध्ये ‘नमक-हराम’ या चित्रपटांत अमिताभ आणि रेखा एकत्र आले, पण या चित्रपटात अमिताभ रेखाची नव्हे तर रेखा-राजेश खन्ना यांची जोडी बनली होती.

रेखा-अमिताभचा पहिला चित्रपट ‘दो अंजाने’: 1976 साली प्रदर्शित झालेल्या ‘दो अंजाने’ या चित्रपटात अमिताभ आणि रेखा पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र आले होते. निर्माता टिटू आणि दिग्दर्शक दुलाल गुहा यांनी दोघांनाही ‘दो अंजाने’ चित्रपटात कास्ट केले. या चित्रपटादरम्यानच अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी एकमेकांना समजून घेतले आणि त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली.

अमिताभसोबत काम करताना रेखा झाली नर्व्हस : मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन आणि रेखाच्या ऑफ-स्क्रीन रोमान्सची चर्चा सुरू झाली. रेखाने सिमी ग्रेवालच्या प्रसिद्ध टॉक शो ‘रोनदेवू’मध्ये या चित्रपटाबद्दल सांगितले होते की, जेव्हा मला समजले की मला अमितजीसोबत ‘दो अंजाने’मध्ये साईन केले आहे, तेव्हा मी थोडी घाबरले होते. या चित्रपटापर्यंत मला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती, कारण आम्हाला एकत्र बसून बोलण्याची संधी मिळाली नाही. मी खूप घाबरलो होते, पण काम करताना खूप काही शिकायला मिळाले.

‘सिलसिला’ ठरला शेवटचा चित्रपट : अमिताभ-रेखा यांचा असा पहिला चित्रपट ‘दो अंजाने’ आणि शेवटचा ‘सिलसिला’ होता. प्रेम त्रिकोणावर बनलेला ‘सिलसिला’ हा रेखा-अमिताभ यांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. या चित्रपटात जया बच्चन देखील होत्या. त्यानंतर अमिताभ-रेखा कधीच पडद्यावर एकत्र आले नाहीत.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Shyamchi Aai Trailer Released
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Shyamchi Aai Trailer Released : बहुचर्चित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित.

Shyamchi Aai Trailer Released : बहुचर्चित 'श्यामची आई' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर...