Friday , 21 June 2024
Home हिडयो Namrata Shirodkar : नम्रता शिरोडकरने अचानक अभिनय क्षेत्राला रामराम का केला? लग्नाच्या 17 वर्षांनंतर धक्कादायक खुलासा….
हिडयो

Namrata Shirodkar : नम्रता शिरोडकरने अचानक अभिनय क्षेत्राला रामराम का केला? लग्नाच्या 17 वर्षांनंतर धक्कादायक खुलासा….

xr:d:DAFcsZda0vM:9,j:481129527,t:23030910

Namrata Shirodkar : मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या नम्रता शिरोडकरने एकेकाळी बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये काम करून लोकांच्या मनावर राज्य केले होते. नम्रताचा जन्म 22 जानेवारी 1977 रोजी मुंबईत झाला. अनेक बड्या स्टार्ससोबत काम केलेली नम्रता पती महेश बाबूसोबत फिल्मी जगापासून दूर लक्झरी लाईफ जगत आहे. या दोघांच्या प्रेमकहाणीबद्दल लेखात जाणून घेऊयात…

नम्रताने सलमान खानसारख्या बड्या स्टारसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटाचे नाव होते ‘जब प्यार किसी से होता है’. या चित्रपटानंतर नम्रताला अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. यादरम्यान तिने ‘कच्चे धागे’, ‘वास्तव’, ‘पुकार’, ‘अलबेला’ ‘दिल विल प्यार व्यार’ यांसारख्या अनेक चित्रपटांत प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले. 2000 मध्ये तिने तेलुगू चित्रपट ‘वामसी’ साईन केला, ज्यामध्ये महेश बाबू मुख्य भूमिकेत होता. महेश बाबूसोबत नम्रताची ही पहिलीच भेट होती.

शूटिंगदरम्यानच अल्पावधीतच महेशने नम्रतावर प्रेम जडले. महेश नम्रतापेक्षा चार वर्षांनी लहान होता. चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात रूपांतरित झाले. मग दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 10 फेब्रुवारी 2005 रोजी दोघांनी सात फेरे घेत लग्नाच्या गाठी बांधल्या . लग्नानंतर नम्रताने अभिनय करिअरला अलविदा केला होता. तिच्या चाहत्यांसाठी हे एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हते. लग्नाच्या 17 वर्षानंतर तिने आपल्या या निर्णयाबाबत मोठा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की, तिचा पती महेश बाबूने तिच्यासमोर एक अट ठेवली होती की, जर तिला लग्न करायचे असेल तर तिला तिच्या अभिनय करिअरला अलविदा करावे लागेल. नम्रताच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीला हे स्पष्ट होते की, त्याला नोकरी करणारी पत्नी नको आहे. मात्र, नम्रताने या लग्नासाठी काही अटीही ठेवल्या होत्या, ज्या महेशनेही मान्य केल्या. नम्रताने आधीच स्पष्ट केले होते की लग्नानंतर जर ती हैदराबादमध्ये राहणार असेल तर महेशला अपार्टमेंटमध्ये शिफ्ट व्हावे लागेल. कारण ती बंगल्यात राहण्यास थोडी अस्वस्थ आहे. यामुळे महेश बाबू लग्नानंतर एका अपार्टमेंटमध्ये राहू लागला. नम्रता भलेही चित्रपट जगतापासून दूर झाली असेल, पण सध्या ती आपल्या कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत आहे.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Shyamchi Aai Trailer Released
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Shyamchi Aai Trailer Released : बहुचर्चित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित.

Shyamchi Aai Trailer Released : बहुचर्चित 'श्यामची आई' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर...