Wednesday , 4 December 2024
Home कर क्लिक Upcoming movies : जुलै महिन्यात ‘हे’ सिनेमे रिलीज होणार.
कर क्लिक

Upcoming movies : जुलै महिन्यात ‘हे’ सिनेमे रिलीज होणार.

Upcoming movie
Upcoming movie : Sillytalk

Upcoming movies : सिनेमा पाहणाऱ्या सिनेमाप्रेमींसाठी जुलै महिन्यात बॉलीवूड आणि हॉलिवूड सिनेमांची मोठी मेजवानी असणार आहे.

कारण जुलै महिन्यात धमाकेदार ऍक्शन, ड्रामा, सस्पेन्स, थ्रिलर आणि रोमान्सनी भरलेले बॉलीवूड आणि हॉलिवूड सिनेमे रिलीज होणार आहेत.

त्यामुळे चाहत्यांसाठी जुलै महिना चांगलाच मनोरंजनाचा ठरणार आहेत.

जुलै महिन्यात नेमके कोणते चित्रपट रिलीज होणार आहेत? तसेच हे चित्रपट कधी रिलीज होतील? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.

Upcoming movies : जुलै महिन्यात ‘हे’ सिनेमे रिलीज होणार.

INSIDIOUS : द रेड डोअर (The Red Door)

INSIDIOUS : द रेड डोअर (The Red Door) हा हॉलिवूड हॉरर सिनेमा थ्रिलर, ऍक्शन आणि सस्पेन्सने भरलेला आहे.

हा सिनेमा जुलैच्या दुसऱ्या आठड्यामध्ये 7 तारखेला रिलीज होणार आहे.

Upcoming movies : 72 हुरैन (72 Hoorain)

’72 हुरैन’ (72 Hoorain) हा सिनेमा रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला हिरवा कंदील दाखलवला पण या सिनेमाच्या ट्रेलरला रिजेक्ट केलं आहे.

तसेच या सिनेमामुळे वाद देखील निर्माण झाला आहे. असं असलं तरी हा सिनेमा 72 हुरैन या एका सत्य प्रथांवरती आधारित आहे.

असं सिनेमा दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. हा देखील सिनेमा 7 जुलै रोजी रिलीज होणार आहे.

Upcoming movies : नियत (Neeyat)

नियत (Neeyat) हा देखील सिनेमा पुढील आठवड्यात 7 जुलै रोजी अमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) या OTT प्लॅटफॉर्म वरती रिली होणार आहे.

अनु मेनन दिग्दर्शित आणि विक्रम मल्होत्रा निर्मित आगामी मर्डर मिस्ट्री सिनेमा आहे.

हेही वाचा : पावसाळ्याचा मनसोक्त आनंद लुटायचा आहे? ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या. जाणून घ्या.

ह्यात विद्या बालन, राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, शहाना गोस्वामी, अमृता पुरी, दिपन्निता शर्मा, प्राजक्ता कोळी, दानेश रझवी आणि मीता वसिष्ठ यांच्या भूमिका आहेत.

मिशन इम्पॉसिबल – डेड रेकोनींग पार्ट वन (Mission: Impossible – Dead Reckoning Part One)

बहुचर्चित बहुप्रतीक्षित टॉम क्रूसचा (Tom Cruise) मिशन इम्पॉसिबल – डेड रेकोनींग पार्ट वन हा हॉलिवूड सिनेमा येत्या 12 जुलैला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा जबरदस्त ऍक्शन फुल्ल थ्रिलरने भरलेला असणार आहे. या सिनेमामध्ये टॉम क्रूस (Tom Cruise) रेबेक्का फर्ग्युसन हे मुख्य भूमिकेत असणार आहेत.

रॉकी और राणी कि प्रेम कहाणी (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani)

रॉकी और राणी कि प्रेम कहाणी (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) हा सिनेमा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सिनेमांपैकी एक आहे.

हा एक फॅमिली ड्रामा सिनेमा असून यामध्ये रोमान्स आणि कॉमेडीचा तडक आहे. या सिनेमामध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट हे प्रमुख भूमिकेत आहेत.

हा सिनेमा 28 जुलैला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटाची कथा लीक झाल्याची बातमी समोर येत आहे.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...