Tuesday , 23 April 2024
Home कर क्लिक Baipan Bhaari Deva Movie : बाईपण भारी देवा या सिनेमाने तीनच दिवसात जमवला 7 कोटींचा गल्ला.
कर क्लिकहिडयो

Baipan Bhaari Deva Movie : बाईपण भारी देवा या सिनेमाने तीनच दिवसात जमवला 7 कोटींचा गल्ला.

Baipan Bhaari Deva Movie
Baipan Bhaari Deva Movie : Sillytalk

Baipan Bhaari Deva Movie : बाईपण भारी देवा हा केदार शिंदे दिग्दर्शित आगामी नवा कोरा मराठी चित्रपट आहे.

या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब चौधरी, शिल्पा नवलकर, सुकन्या कुलकर्णी मोने, रिया शर्मा आणि तुषार दळवी यांच्या भूमिका आहेत.

सगळ्याच महत्वाच्या कलाकार स्त्रिया आहेत. एक वेगळा भन्नाट सिनेमा असणार आहे हा. हा चित्रपट 30 जून 2023 रोजी प्रदर्शित झाला आहे.

Baipan Bhaari Deva Movie : या चित्रपटातील काही प्रमुख कलाकार आणि तंत्रज्ञ:

  • दिग्दर्शक : केदार शिंदे
  • निर्माते : माधुरी भोसले, जिओ स्टुडिओ
  • संगीत : साई-पियुष
  • गीत : गुरु ठाकूर
  • छायाचित्रण : मिलिंद जोग
  • संपादन : संजय सांकला

Baipan Bhaari Deva Movie : जमवला 7 कोटींचा गल्ला :

बाईपण भारी देवा हा चित्रपट लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. 30 जून रोजी प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

हेही वाचा : Talathi Bharti 2023 : राज्यात 4 हजाराहून अधिक जागांसाठी तलाठी भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती.

या चित्रपटाने तीनच दिवसामध्ये 7 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.3 कोटींचा गल्ला जमवला होता. दुसऱ्या दिवशी 2.45 कोटी रुपयांची कमाई केली होती तर तिसऱ्या दिवशी या सिनेमाने तब्बल 3.30 कोटींची कमाई केली आहे. त्यानुसार या सिनेमाने तीन दिवसामध्ये जवळपास एकूण 7.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

महिलांचा चांगला प्रतिसाद :

‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट महिलांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. कारण या सिनेमाची स्टोरी ही काही विचित्र परिस्थितीमुळे विभक्त झालेल्या सहा बहिणींवरती आधारित आहे. तसेच त्यांना मंगळागौर स्पर्धेसाठी एकत्र येण्यास भाग पाडले जाते. आणि मग होणाऱ्या गमती जमती त्यांच्यातले रुसवे फुगवे आणि पुनर्मीलन ह्याभोवती हा सिनेमा फिरतो. त्यामुळे महिलांनी या सिनेमाला चांगलाच प्रतिसाद दिला असून हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक महिला आपल्या कुटुंबियांसोबत जात आहेत. तर मैत्रिणींचा ग्रूप, महिला मंडळदेखील हा सिनेमा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात सिनेमा गृहात गर्दी करत आहेत.

एकंदरीत, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या ट्रेलरला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कलाकारांचा दमदार अभिनय, हृदयस्पर्शी कथा आणि सुंदर सिनेमॅटोग्राफीसाठी सिनेमाची प्रशंसा झाली आहे.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...