Hema Malini after marriage story : माचो मॅन धर्मेंद्र आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी ह्यांची प्रेमकहाणी खरंतर अजूनही ट्रेंडिंग आहे.
लग्न झालेले असताना सुद्धा धर्मेंद्रने 1980 साली हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यानंतर त्यांना 2 मुली झाल्या.
पण लग्न झाल्यानंतर खरी कसरत करावी लागली ती हेमा मालिनी यांना. कारण धर्मेंद्र यांचं हे दुसरं लग्न होत.
पाहिलं लग्न त्यांचं प्रकाश कौर यांच्या सोबत झालं होत.
त्यांच्यापासून त्यांना चार मुले झाली होती. एवढं सगळं असताना देखील हेमा मालिनी यांनी त्यांच्याशी लग्न केलं.
Hema Malini after marriage story : सून म्हणून स्वीकारण्यास नकार?
हेमा मालिनी त्यांच्या पहिल्या अपत्यापासून गरोदर राहिल्यानंतर धर्मेंद्र यांची आई सतवंत कौर यांना पहिल्यांदा भेटल्या.
सतवंत कौर हेमा मालिनी यांना आपली सून म्हणून स्वीकारण्यास नाखूष होत्या, कारण धर्मेंद्र यांचे आधीच प्रकाश कौर यांच्याशी लग्न झाले होते.
रेडिफला दिलेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी सांगितले की, सतवंत कौर यांना भेटताना त्या घाबरल्या होत्या, पण त्यांचे स्वागत “खुल्या हातांनी” झाले.
तसेच हेमा मालिनी यांनी सांगितले की धर्मेंद्र यांच्या आई सतवंत कौर या एक अतिशय दयाळू आणि समजूतदार व्यक्तिमत्व असलेल्या स्त्री होत्या.
त्यानंतर हेमा मालिनी आणि सतवंत कौर यांचे जवळचे नाते होते आणि सतवंत कौर हेमा मालिनी यांना आयुष्यभर आधार देत होत्या.
हेमा मालिनी यांच्या मुली ईशा आणि आहाना यांच्याही त्या प्रेमळ आजी होत्या.
सतवंत कौर यांचे 2006 मध्ये वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. हेमा मालिनी यांना त्यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आणि त्यांनी सांगितले की ते “तिला कधीच विसरणार नाहीत”.
प्रकाश कौर यांना यांना कधीही भेटल्या नाहीत…
हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांना कधीही भेटल्या नाहीत. याबाबतच कारण त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं.
हेमा मालिनी म्हणाल्या की माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, तसेच माझ्यामुळे कोणाचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये, अशी माझी इच्छा होती.
त्यामुळे मी प्रकाश कौर यांना कधीच भेटले नाही. तसेच प्रकाश कौर यांचा मी कायम आदर करते.
एवढंच काय तर या कारणामुळे नुकत्याच पार पडलेल्या करण देओलच्या लग्नाला देखील हेमा मालिनी उपस्थित नव्हत्या.