Sunday , 15 September 2024
Home कर काड्या Top Bollywood Horror Movies : बॉलिवूडमधील टॉप हॉरर चित्रपट.
कर काड्याकर क्लिकहिडयो

Top Bollywood Horror Movies : बॉलिवूडमधील टॉप हॉरर चित्रपट.

Top Bollywood Horror Movies
Top Bollywood Horror Movies : Sillytalk

Top Bollywood Horror Movies : भारतमध्ये हॉरर चित्रपटांचा मोठा चाहतावर्ग आहे. कारण हॉरर चित्रपट हे काल्पनिक घटकांनी भरलेले असतात.

तसेच या सिनेमांमध्ये रोजच्या चित्रपटांपेक्षा काहीतरी वेगळं असत.

म्हणजेच इत्तर सिनेमांप्रमाणे ढिशुम-ढिशुम किंवा सासू सुनाचे भांडणं आणि त्यात असणारे रडगाणे या सिनेमांमध्ये नसतात.

Top Bollywood Horror Movies
Top Bollywood Horror Movies : Sillytalk

त्यामुळे हॉरर फिल्म पाहताना काही वेगळा थ्रिल येतो. तर जाणून घेण्यात बॉलीवूडच्या काही टॉप हॉरर सिनेमांबद्दल…

Top Bollywood Horror Movies : बॉलिवूड हॉरर चित्रपटांची यादी :

Top Bollywood Horror Movies : 1920 आणि 1920 द इविल रिटर्न्स

1920 हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द एक्सोर्सिस्ट’ या चित्रपटावरून हा चित्रपट साकारण्यात आला आहे.

हा चित्रपट तमिळ आणि तेलुगू भाषेतही डब करण्यात आला होता आणि १९२०: द इविल रिटर्न्स या चित्रपटाचा सिक्वेल 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता.

Top Bollywood Horror Movies : वास्तुशास्त्र (2004)

वास्तुशास्त्र हा देखील चित्रपट बॉलिवूडमधील सर्वोकृत्त हॉरर चित्रपटांपैकी एक आहे. वास्तुशास्त्र हा 2004 मध्ये रिलीज झाला होता.

हेही वाचा : IBPS Clerk Recruitment 2023 : IBPS मार्फत 4 हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करायचा? पाहा.

या चित्रपटामध्ये सुष्मिता सेन, पीया राय चौधरी, जेडी चक्रवर्ती, अहसास चन्ना, राजपाल यादव आणि पूरब कोहली या मुख्य कलाकारांनी काम केलं आहे.

Top Bollywood Horror Movies : 13 B (2009)

टीव्ही लोकांना सतावू शकतो का? असं होऊ शकतं की नाही, हे तुम्हाला हा भन्नाट हॉरर सिनेमा पाहिल्यावर कळेल.

यामध्ये सचिन खेडेकर, आर. माधवन, पूनम ढिल्लन, सरन्या पोनवनन आणि नीतू चंद्रा यांसारख्या तंगड्या स्टारकास्टने काम केलं आहे.

13 B हा सध्या पाहण्यासाठी सर्वोत्कृष्ट बॉलिवूड हॉरर चित्रपटांपैकी एक आहे.

भूल भुलैया (2007)

रहस्य, कॉमेडी, हॉरर एलिमेंट्स आणि रोमान्सने परिपूर्ण असल्याने भूल भुलैया हा बॉलिवूडचा टॉप रेटेड हॉरर चित्रपट आहे.

यामध्ये शाइनी आहूजा, अक्षय कुमार, परेश रावल, विद्या बालन, मनोज जोशी, असरानी, अमिषा पटेल, राजपाल यादव, विक्रम गोखले या सुपरस्टार कलाकारांनी काम केलं आहे.

स्त्री (2018)

‘वो स्त्री है, कुछ भी कर सक्ती है’ हा या महाकाय हॉरर चित्रपटातील एक प्रसिद्ध डायलॉग आहे जो कधीही विसरता येणार नाही.

हा चित्रपट प्रसिद्ध भारतीय लोककथेवर आधारित आहे ज्यात एका दुष्ट आत्मा आहे जी रात्री माणसांचा पाठलाग करते आणि त्यांचे अपहरण करते.

स्त्रीने अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार जिंकले आहेत आणि नेटफ्लिक्सवरील सर्वोत्कृष्ट बॉलिवूड हॉरर चित्रपटांपैकी एक आहे.

तुंबाड (2018)

लोभी असण्यामुळे जगातील सर्व दु:खांची दारे उघडू शकतात आणि ही गोष्ट चित्रपटात उत्तमरित्या दाखवण्यात आली आहे.

हा चित्रपट समृद्धीच्या एका देवीबद्दल आहे ज्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली आणि मानवाने तिच्या पहिल्या बाळासाठी मंदिर बांधल्यानंतर घडलेल्या घटनांबद्दल आहे.

या चित्रपटाने विविध प्रतिष्ठेची पारितोषिके जिंकली आणि भारतात तयार झालेल्या सर्वोत्कृष्ट पीरियड हॉरर चित्रपटांपैकी एक आहे.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...