Sunday , 15 September 2024
Home कर क्लिक Lust Stories 2 : ‘लस्ट स्टोरीज 2’ मधील बोल्ड सीनमुळे तमन्ना होतेय ट्रोल… यावर तमन्ना म्हणाली…
कर क्लिकवाच ना भो

Lust Stories 2 : ‘लस्ट स्टोरीज 2’ मधील बोल्ड सीनमुळे तमन्ना होतेय ट्रोल… यावर तमन्ना म्हणाली…

Lust Stories 2
Lust Stories 2 : Tamannaah Bhatia

Lust Stories 2 : ‘लस्ट स्टोरीज 2’ या सिरीज मधील भूमिकेमुळे तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सध्या खूप चर्चेत आहे.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा (Tamannaah Bhatia and Vijay Verma) या सिरीजच्या एका भागात दिसले आहेत.

दोघांमध्ये अनेक इंटिमेट सीन्स शूट करण्यात आले आहेत. त्याशिवाय तमन्नाने ‘जी कर्दा’ नावाच्या वेब सिरीज मध्येही काम केले आहे जिथे तिने काही बोल्ड सीन्स केले होते.

काही लोकांना ते आवडले नाही आणि दोन्ही वेब सिरीजमध्ये इंटिमेट सीन्स केल्यामुळे तिच्याबद्दल वाईट गोष्टी बोलल्या गेल्या आहेत.

आता या सगळ्यावर तमन्ना भाटियाने प्रतिक्रिया दिली आहे.

Lust Stories 2 : काय म्हणाली तमन्ना भाटिया?

अलीकडेच, एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये, तमन्नाने ‘लस्ट स्टोरीज 2’, ‘जी कर्दा’ मधील बोल्ड सीन शूट केल्याबद्दल तिच्यावर झालेल्या टीकेबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तमन्नाने म्हटलं आहे की, काही लोक तिच्या मुली असण्याबद्दल आणि तो सीन करण्याबद्दल वाईट आणि अयोग्य गोष्टी बोलत आहेत.

जेव्हा मला हे समजले की इंटिमेट सीन करण्यासाठी लोक माझी टीका करत आहे तेव्हा मला धक्का बसला. असा देखील तिने म्हटलं आहे.

Lust Stories 2 : …महिला असल्यामुळे मी ट्रोल होतेय?

तसेच तमन्नाने म्हटले आहे की, ‘एका महिलेने इंटिमेट सीन दिले त्यामुळे मला या सगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागते.

अभिनेते जेव्हा इंटिमेट दृश्ये शूट करतात तेव्हा त्यांना अशा प्रकारच्या ट्रोलिंगचा सामोरे जावे लागत नाही.

पण, जेव्हा एखादी महिला कलाकार असे करते तेव्हा तिला सर्व बाजूने टीकेला सामोरे जावे लागते.

विचित्र कॅमेंटमुळे अस्वस्थ झालेय…

तमन्नाने पुढे म्हटले आहे की, तिच्यावर अनेक स्त्रीविरोधी कमेंट करण्यात आल्या.

लोक म्हणाले, ‘काय मजबुरी होती कि असे सीन्स करतेय.’ अशा कमेंट्स पाहिल्यानंतर तिला खूप विचित्र वाटले.

तसेच तमन्नाने म्हटले आहे की, तिला एक कलाकार म्हणून ओळख निर्माण करायची मला अशा काही छोट्या भूमिका करण्यापुरते मर्यादित राहायचे नाहीये.

तसेच वेब सीरिजमध्ये इंटिमेट सीन दिल्याबद्दल मला अशा प्रकारच्या टीकेची अजिबात अपेक्षा नव्हती. अशी खंत देखील तमन्नाने बोलून दाखवली आहे.

विजय वर्मामुळे आली होती चर्चेत :

‘लस्ट स्टोरीज 2’ मधील केलेल्या बोल्ड सीनमुळे तमन्ना भाटिया सोशल मीडिया द्वारे जास्तच ट्रोल होताना दिसत आहे.

त्यामुळे तमन्ना हताश झाल्याचं पण दिसत आहे. परंतु तमन्ना आणखी एका दुसऱ्या प्रकरणामुळे चर्चित आली आहे.

काही दिवसांपूर्वी तमन्नाने विजय वर्मा आणि तिच्या नात्या संबंधी इंस्टाग्राम वर एक स्टोरी टाकली होती.

ही स्टोरी सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाली होती. तेव्हा देखील ती बऱ्यापैकी ट्रोल झाली होती तर काहींनी तमन्नाला शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

‘लस्ट स्टोरीज 2’ 29 जून रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. त्यात चार लघुपट आहेत. तमन्नाशिवाय मृणाल ठाकूर, काजोल, अमृता सुभाष या मोठ्या अभिनेत्रींनीं देखील यामध्ये काम केलं आहे.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...