Wednesday , 4 December 2024
Home कर क्लिक Jawan Movie Trailer Release : बहुचर्चित शाहरुख खानच्या ‘जवान’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज.
कर क्लिकहिडयो

Jawan Movie Trailer Release : बहुचर्चित शाहरुख खानच्या ‘जवान’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज.

Jawan Movie Trailer Release
Jawan Movie Trailer Release : SIllytalk

Jawan Movie Trailer Release : बहुचर्चित बहुप्रतीक्षित शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) जवान या सिनेमाचा ट्रेलर अखेर आज रिलीज झाला आहे.

टीझर लाँच झाल्यानंतर ट्रेलर कधी येतोय याची सर्व चाहते वाट पाहत होते. अखेर जवान’चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे.

जवान’च्या ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन सीन्सची भरमार पाहायला मिळत आहे. त्यामुळे चित्रपट देखील धमाकेदार असेल यात काही शंकाच नाही.

Jawan Movie Trailer Release : तंगडी स्टारकास्ट

जवान सिनेमामध्ये तगडी स्टारकास्ट आहे. यामध्ये साऊथ सुपस्टारचाही समावेश आहे.

या चित्रपटात शाहरुख खानसह साऊथ सुपस्टार विजय सेतुपती आणि अभिनेत्री नयनतारा हे देखील प्रमुख भूमिकेमध्ये असणार आहे.

यासोबत दीपिका पदुकोणचा हटके अंदाज या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : SSC मार्फत हवालदार पदांच्या 1558 जागांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

याशिवाय सिनेमामध्ये सुनील ग्रोव्हर, गिरिजा ओक, सान्या मल्होत्रा, आलिया कुरेशी, प्रियमणी, संजिता भट्टाचार्य, लहर खान, मुकेश छाबरा आणि रिद्धी डोंगरा हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेमध्ये असणार आहे.

शाहरुख खानचा डायलॉग….

ट्रेलरच्या शेवटी “जब मैं विलन बनता हूँ ना… तब मेरे सामने कोई हिरो टिक नाही सकता” शारुख खानच्या या डायलॉगने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जवान या सिनेमामध्ये शाहरुख व्हिलन आहे की हिरो हे आपल्याला हा सिनेमा पाहिल्यानंतरच समजेल.

Jawan Movie Trailer Release : ट्रेलर पहा :

‘जवान’ या सिनेमाचं दिग्दर्शन साऊथ इंडियन सिनेसृष्टीतील नव्या दमाच्या सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या अ‍ॅटलीने केलं आहे.

तसेच दिग्दर्शक अ‍ॅटलीने ‘जवान’ या सिनेमाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. चित्रपटाची निर्मिती गौरी खानने केली असून सहनिर्माता गौरव वर्मा आहे.

सिनेमा कधी होणार प्रदर्शित?

जवान हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेत प्रदर्शित होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे सिनेमा रिलीज होण्याआधीच या सिनेमाचे OTT राईट्स 250 कोटी रुपयांना विकले गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...