OMG 2 Teaser Out : अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘Oh My God 2’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
त्यातच आज अक्षय कुमारने त्याच्या सोशल मेडिया अकाऊंटवरून ‘ओह माय गॉड 2’चा टिझर शेअर (OMG 2) केला आहे.
अमित राय दिग्दर्शित हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अनिल शर्मायांच्या ‘गदर 2’ या चित्रपटाशी या चित्रपटाची टक्कर होणार आहे. हा विनोदी ड्रामा 2012 मध्ये आलेल्या ‘OMG- ओह माय गॉड’ या हिट चित्रपटाचा सिक्वेल आहे.
OMG 2 Teaser Out : अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांची केमिस्ट्री :
अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड 2’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात अक्षय कुमार भगवान शंकरांच्या अवतारात दिसत आहे.
ओएमजी 2 मध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त यामी गौतम, पंकज त्रिपाठी आणि अरुण गोविल हे मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत.
टीझरची सुरुवात पंकज त्रिपाठीने देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून केली आहे.
त्यामुळे या सिनेमात अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांची वेगळी केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळू शकणार आहे.
त्यात यामी गौतम ही वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. पहिल्या भागात परेश रावल नास्तिक होते, पण इथे पंकजची व्यक्तिरेखा देवावर विश्वास ठेवणारी दाखवण्यात आली आहे.
टीझरमध्ये भगवान शंकराच्या भूमिकेत अक्षय कुमार खूपच वेगळा दिसत आहे. तसेच त्याचे लूक वेगवेगळे आहेत. तर पंकज त्रिपाठी त्याच्या परिपूर्ण भक्ताच्या भूमिकेत आहे.
OMG 2 Teaser Out : ‘ओएमजी 2’चा टिझर येथे पहा :
अक्षय कुमारने देखील टिझर केला शेअर :
‘ओएमजी 2’ बद्दल
‘ओएमजी 2’चे लेखन आणि दिग्दर्शन अमित राय करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती केप ऑफ गुड फिल्म्स, अश्विन वर्दे, विपुल डी शहा आणि राजेश बहल यांनी केली आहे.
डॉ. चंद्रप्रकाश दिवेदी हे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण अमलेंदु चौधरी यांनी केले आहे.