OMG 2 Movie : OMG 2 ह्या सिनेमाच्या मागे काही ना काही दुष्टचक्र लागले आहे. सिनेमात सेन्सर बोर्ड ने अनेक कट्स सुचवले आहेत.
गदर 2 (Gadar 2) पण रिलीज होण्याच्या दिवशीच हा सिनेमा रिलीज होत आहे.
नेमकं कोण बाजी मारणार ह्या दोन्ही सिनेमाच्या फाईट मध्ये हे कळेलच. अक्षयकुमार (Akshay Kumar) एका मोठ्या हिट सिनेमाच्या शोधात आहे.
गेले काही दिवस त्याचे सिनेमे सातत्याने फ्लॉप होत आहेत.
बिग बजेट सिनेमे, विविध विषयांवरील सिनेमे फ्लॉप होऊन खिलाडी अक्षयकुमार फ्लॉप ची मालिका चालवत आहे.
सम्राट पृथ्वीराज चौहान, लक्ष्मी बॉम्ब, बच्चन पांडे, रामसेतू हे सिनेमे पण फारसे चालले नाहीत.
या चित्रपटांवरुन सुद्धा अक्षयला वादाचा सामना करावा लागला होता.
OMG 2 Movie : OMG 2 च्या अडचणींमध्ये वाढ –
OMG 2 चा ट्रेलर आला तेंव्हापण काही घटकांनी टीका केलेली. ट्रेलर ने उत्सुकता चांगलीच वाढवलेली. ट्रेलर करोडो लोकांनी पाहिला. शेअर केला.
पण ट्रेलरवर (OMG 2 Trailer) प्रतिक्रिया देताना महाकाल मंदिराचे पुजारी भडकले.
ट्रेन स्टेशनवर बसलेला शिव भगवान, कचोरी घेणारा भगवान अश्या गोष्टी भगवान शिवशंकर साकारताना दाखवणे गैर वाटते.
महाकाल मंदिराचे मुख्य पुजारी महेश शर्मा ह्यांनी दाखल केलेल्या एका जनहित याचिकेत महाकालशी संबंधित जे सीन्स आहेत ते मेकर्सनं काढून टाकावेत ह्यासाठी एक अर्ज सादर केला आहे.
तसेच सिनेमाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीसही पाठवली आहे.
OMG 2 या सिनेमाचा ट्रेलर
…तर सिनेमाचं प्रदर्शित करता येणार नाही –
सेन्सर बोर्डाने ‘A’ सर्टिफिकेट दिले आहे. त्यामुळे आधीच संतापलेले निर्माते आता म्हणताय की आता अजून कट्स जर सिनेमात केले तर सिनेमाचं प्रदर्शित करता येणार नाही.
काही नेटकऱ्यानी अक्षय कुमारला (Akshay Kumar) ट्रोल केले आणि त्यात म्हटले की तू धर्माचा अपमान करत आहेस.
बॉलिवूडमधल्या चित्रपटातुन धर्माचा आणि देवाचा अपमान सातत्याने करण्यात येतो आहे.
उगाच प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या जातील असं काही करु नका.
चित्रपट रिलिज करण्यापुर्वीच काळजी घ्या, अशी तंबी ऑनलाईन अनेक सिनेमा प्रेमींनी दिली आहे.
येत्या शुक्रवारी सिनेमा रिलीज होईल की नाही हे समजेलच पण ट्रोल करणे आणि सिनेमाला विरोध करणे हे आजकाल सातत्याने वाढायला लागले आहे.