Secret of Bollywood Stars : आज आम्ही तुम्हाला अशा स्टार्सची ओळख करून देणार आहोत ज्यांना कलाकार नव्हे तर आर्मी ऑफिसर व्हायचे होते.
या यादीत शाहरुख खानपासून ते दिव्यांका त्रिपाठीपर्यंतचा समावेश आहे.

Secret of Bollywood Stars : कोणते आहेत हे कलाकार?
शाहरुख खान
शाहरुख खानने आयुष्यात भारतीय सैन्य अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते.
खऱ्या आयुष्यात तो हे स्वप्न पूर्ण करू शकला नाही, पण पडद्यावर त्याला अनेकदा आर्मी ऑफिसर बनण्याची त्याला संधी मिळाली.
अक्षय कुमार
अक्षय कुमारलाही आर्मी ऑफिसर व्हायचं होतं. कारण त्याचे वडील सैन्यात होते.
अक्षयने सांगितले होते की, त्याने या गोष्टीची तयारी देखील केली होती, परंतु वेळेने त्याला अभिनेता बनवले.
हेही वाचा : Highest Tax paying Indian Celebrities : उच्च Tax भरणारे भारतीय सेलिब्रिटी.
दिव्यांका त्रिपाठी
दिव्यांका त्रिपाठीने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला आर्मी ऑफिसर बनायचे आहे.
तिला रायफल शूटिंगमध्ये पदकही मिळाले आहे. नशिबाने तिला टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनवली.
सोनू सूद
सोनू सूद अनेकदा पडद्यावर आर्मी ऑफिसर बनला आहे. पण खऱ्या आयुष्यातही त्याचे स्वप्न सैन्यात भरती होण्याचे होते. पण काळाच्या वळणाने तो अभिनेता बनला.
रणविजय सिंघा
रणविजय सिंघाने लष्करी अधिकारी बनण्याची पूर्ण तयारी केली होती.
तेवढ्यात त्याला ‘रोडीज’चा फोन आला आणि तो त्यात गेला. ते म्हणतात की त्याच्या कुटुंबातील अनेक पिढ्यांनी सैन्यात सेवा केली आहे.
निम्रत कौर
निम्रतचे वडील आर्मी ऑफिसर आहेत. ती स्वतः लहानपणापासून आर्मी ऑफिसर होण्याचे स्वप्न पाहत असे. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिला समजू लागले की, आर्मी ऑफिसर बनणे ही काही सोपी गोष्ट नाही.