Thursday , 30 May 2024
Home कर काड्या Gautami Patil : गौतमी पाटील कशी काय झाली लोकप्रिय, वाचा इनसाईड स्टोरी…
कर काड्या

Gautami Patil : गौतमी पाटील कशी काय झाली लोकप्रिय, वाचा इनसाईड स्टोरी…

Gautami Patil : Sillytalk

Gautami Patil : महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात गौतमी पाटीलच्या अदांवर फिदा असणाऱ्या पोट्ट्यांची कमी नाही.

सोशल मीडियामुळे गौतमी अगोदर तरूणाईच्या मोबाईलमध्ये आणि नंतर ह्रदयात घर करून बसली आहे.

गौतमीच्या फॅन फॉलोविंगचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. गौतमीचे व्हिडीओ, फोटोशूट आणि कार्यक्रमांची गर्दी पाहता तिचे क्रेझ कळून येते.

मात्र अवघ्या काही वर्षात बॅक ग्राऊंड डान्सर ते स्टार होण्यापर्यंत गौतमीने नक्की काय केलंय? हे जाणून घ्यायला सर्वांनाच आवडेल. मग, हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि जास्तीत-जास्त शेअर करा…

Gautami Patil : गौतमी पाटीलची इनसाईड स्टोरी

गौतमी तशी मुळ धुळ्याची. सिंधखेडा या गावात तिचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर आई-वडील वेगळे झाले.

दरम्यान आई नोकरी करायची पण तिचा अपघात झाल्यानंतर गौतमीवर घरची जबाबदारी आली. तिने आठवीपर्यंत शिक्षण घेतले.

हेही वाचा : Panjabi Breakfast : …ओ पाजी परांठा, लस्सी हो जाये !! पंजाबमधील काही लोकप्रिय नाश्त्याचे 7 प्रकार.

आईचे आजारपण आणि घरच्या परिस्थितीमुळे यामुळे शिक्षण सोडून नृत्याकडे वळल्याचे गौतमी सांगते.

गौतमी सुरुवातीपासून पुण्यातील विश्व कला नृत्य अकादमी येथे नृत्याचं प्रशिक्षण घेत होती. त्यामुळे नृत्य क्षेत्रातच काम करून गुजराण करण्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले.

सर्वात अगोदर महेंद्र बनसोडे यांनी गौतमीला अकलूज लावणी महोत्सवात पहिल्यांदा बॅक डान्सर म्हणून नृत्याची संधी दिली. पुढे संपर्क वाढत जाऊन नृत्याच्या विविध सुपाऱ्या मिळत गेल्या.

खऱ्या अर्थाने सोशल मीडियाने गौतमीला प्रसिद्धी मिळवून दिली. आपल्या डान्स आणि अदांनी तरुणांना वेड लावणारी गौतमी सतत चर्चेत असते.

यापूर्वी ती टिक-टॉकवर तिचे डान्स व्हिडीओ अपलोड करत. टिक टॉकच्या बंदीनंतर ती डान्सचे छोटे-छोटे व्हिडीओ इंस्टाग्रामवर अपलोड करत असतं.

गौतमीला लावणी डान्सर म्हणून ओळखलं जातं. मात्र गौतमी याला लावणी मानत नाही.

अनेक कार्यक्रमात गौतमीला डान्स करण्यासाठी बोलवलं धाडलं जातं आणि त्यासाठी तिला मानधन देखील दिलं जातं.

गौतमी पाटीलचे डान्स व्हिडीओ यूट्युब, इंस्टाग्राम, फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

गेल्या अनेक वर्षांपासून गौतमी देश-विदेशात तिचे नृत्य सादरीकरण करत आहे.

सिनेसृष्टीतील एखाद्या कलाकाराची जितकी क्रेझ नसते, तितकी गौतमीची क्रेझ दिसते आहे. गौतमीच्या डान्सचे कार्यक्रम राज्यभर वेगाने वाढत आहेत. तिचे म्यझिक अल्बमही लॉन्च झाले आहेत. गौतमीच्या डान्स कार्यक्रमांनी तुफान गर्दी होतना दिसते आहेत. प्रेक्षक कुणी झाडावर बसून तिचा डान्स बघतोय, तर कुणी गच्चीवर चढतोय. तिची ही क्रेझ पाहिल्यानंतर आगामी काळात ती एखाद्या चित्रपटात काय जादू करते? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Related Articles

Abhijeet Bhattacharya : Romantic Voice of Bollywood
कर काड्यावाच ना भो

Abhijeet Bhattacharya : Romantic Voice of Bollywood : अभिजीत भट्टाचार्य

Abhijeet Bhattacharya : Romantic Voice of Bollywood : बॉलिवूडमधील 90 च्या दशकानंतरचा...

Hema Malini Dream Girl of Bollywood : Happy Birthday Hema Malini
कर काड्यावाच ना भो

Hema Malini Dream Girl of Bollywood : बॉलीवूडचे कालातीत सौंदर्य – हेमा मालिनी

Hema Malini Dream Girl of Bollywood : अभिनयाच्या तसेच सौंदर्याच्या प्रतिभेने मन...

The Unfolding Drama
कर काड्यावाच ना भो

The Unfolding Drama : बॉलिवूडमधील राजकीय चित्रपट.

The Unfolding Drama : बॉलिवूडमधील राजकीय चित्रपट (Political films in Bollywood) कोणते?...