Sunday , 15 September 2024
Home वाच ना भो Beautiful Female singers : ‘या’ 7 सुंदर गायिका बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींपेक्षा काही कमी नाहीत!
वाच ना भो

Beautiful Female singers : ‘या’ 7 सुंदर गायिका बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींपेक्षा काही कमी नाहीत!

Beautiful Female singers : Silly Talk

Beautiful Female singers : जर विचार केला तर बॉलिवूडमध्ये अशा काही गायिका आहेत, ज्या अभिनेत्रींपेक्षा सुंदर आहेत.

तरुणाईमध्ये याची कमालीची क्रेझ असल्याचे पाहायला मिळते. अवघ्या काही वर्षात या गायिकांनी आपली ओळख बनवलीय. या यादीत नक्की कोण आहे, जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा…

Beautiful Female singers : https://sillytalk.in/

ध्वनि भानुशाली :

मुंबईत जन्मलेली आणि देहरादूनमध्ये शिकलेली ध्वनि तिच्या “वास्ते” या गाण्याने फेमस झाली होती. तिने बॉलिवूडमधील अनेक अल्बम तसेच “किन्ना सोना” तसेच “दिलबर” सारखे हिट गाणे गायले. ही गाणी प्रेक्षकांमध्ये कमालीची लोकप्रिय झाली. सोशल मीडियावरही तिची मोठी फॅन फॉलोअिंग आहे.

मोनाली ठाकूर :

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार विजेती मोनाली देखील आपल्या गाण्यांसाठी लोकप्रिय आहे. तिने ‘ये मोह मोह के धागे’, संवार लूं, ‘बद्री की दुल्हनिया’ आदी लोकप्रिय गाणी गायलीत.

हेही वाचा : मज्जानु नाश्ता ! गुजरातमधील काही लोकप्रिय नाश्त्याचे पर्याय

रुपाली जग्गा :

रुपाली बॉलिवूडमधील अतिशय हुशार आणि देखणी गायिका आहे. ‘सारेगामा’ या रिअ‍ॅलिटी शोची ती फायनलिस्ट होती. 2007 मध्ये साधना वाहिनीवरील भजन सम्राटची ती विजेती होती. 2017 मध्ये तिला ‘भारत का शकीरा इन सारेगममापा’ ही पदवी देखील मिळाली. तिने बॉलिवूडमध्ये पार्श्वगायका म्हणून देखील पदार्पण केले.

नीती मोहन :

विशेषतः हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गाणाऱ्या नीतीने तमिळ, तेलगू, कन्नड, बंगाली, मराठी, पंजाबी आणि इंग्रजी भाषेतही गाणी गायलीय. ती चॅनल ‘V’ च्या रिअ‍ॅलिटी शो पॉपस्टारची विजेती होती. तिने नैनों वाले ने, वफा ने बेवफाई, पिया मोरे, सपना साया, आदींना गाण्यांना आपला आवाज दिलाय. तिचे सौंदर्य अनेकांना घायाळ करुन टाकते

पलक मूछल :

पलक बॉलिवूडमधील सर्वात सुंदर गायकांपैकी एक तर आहेच. सोबत तिने सामाजिक कार्यात जागतिक विक्रम देखील नोंदविला आहे. पलक प्रतिभाशाली आणि अत्यंत हुशार आहे. तिने आशिकी 2, एक था टायगर, एमएस धोनी, बागी 2, प्रेम रतन धन पायो अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी आपला आवाज दिलाय.

शर्ली सेतिया :

यु ट्यूब सेन्सेशन म्हणून ओळखली जाणारी क्यूट चेहऱ्याची शर्ली बॉलिवूडमधील सर्वात सुंदर गायकांपैकी एक मानली जाते. यु ट्यूबपासून सुरु झालेला तिचा प्रवास आज बॉलिवूड गायिकेपर्यंत येऊन ठेपलाय. मुळ न्यूझीलंडची असणारी शर्ली आपल्या पॉप गाण्यांसाठी ओळखली जाते. शर्लीचे यु ट्यूबवर कोट्यवधी चाहते आहेत.

सुनंदा शर्मा :

सुनंदा एक पार्श्वगायिका तसेच चित्रपट अभिनेत्री देखील आहे. मूळची पंजाबी असणाऱ्या सुनंदाने ‘बिली अख’ पासून आपले करिअर तर “तेरे नाल नाचना” गाण्यातून बॉलिवूड पदार्पण केले. तिने देखील यु ट्यूबपासून आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. आज ती आघाडीची गायिका मानली जाते.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...