Thursday , 30 May 2024
Home कर क्लिक Adharwad Marathi Movie : आधुनिक कुटुंब व्यवस्थेवर भाष्य करणारा ‘आधारवड’ मराठी चित्रपट.
कर क्लिक

Adharwad Marathi Movie : आधुनिक कुटुंब व्यवस्थेवर भाष्य करणारा ‘आधारवड’ मराठी चित्रपट.

Adharwad Marathi Movie
Adharwad Marathi Movie : Sillytalk

Adharwad Marathi Movie : आधुनिक जीवनशैली आणि त्याने कुटुंबावर होणारा परिणाम याबद्दल आपण अनेक ठिकाणी बोलत असतो, वाचत असतो. असाच अनुभव आता आपल्याला पडद्यावरही पाहायला मिळणार आहे. ‘आधारवड – एक प्रेमकथा’ असे या चित्रपटाचे नाव असून हिंगलाजमाता फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे निर्माते राजकुमार हंचाटे आहेत. सुरेश झाडे-भावसार यांनी चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. येत्या 23 जून पासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

‘आधारवड’ या चित्रपटात नयना (समृद्धी शिमगे) आणि श्रावण (रोहित हंचाटे) यांच्यात फुललेली केमेस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बदलत्या काळानुसार मुलांच्या आई वडिलांविषयीच्या भावना कशा बदलतात, वृद्धपकाळात मुले त्यांच्याशी ज्या पद्धतीने वृद्धाश्रमात जाण्यास भाग पडतात हे हृदय पिळवटून टाकणारे वास्तव यात दाखवण्यात आले आहे. हे संपूर्ण कथानक श्रावण यांच्याभोवती फिरत असून एक बाप म्हणून आपल्याला मुलाला समाजातील या भीषण वास्तवाची जाणीव करून देण्यासाठीचा संघर्षही आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळेल. टिझर आणि ट्रेलरनंतर हा वेगळा धाटणीचा चित्रपट असल्याचे प्रेक्षकांच्या लक्षात आले होते. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रेक्षकगृहात येतो याची उत्सुकता वाढली होती.

Adharwad Marathi Movie : ‘या’ सिनेमाचा ट्रेलर :

शक्ती कापूरसह तगडी स्टारकास्ट :

समृद्धी शिमगे, रोहित हंचाटे या चित्रपटातून पदार्पण करत असून प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत हिचे ठुमकेही आपल्याला यात पाहायला मिळतील. तर हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर यांचीही प्रमुख भूमिका असल्याने टिझर आणि ट्रेलरच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये तयार झालेली उत्सुकता आणखीनच शिगेला पोहचली आहे. हा वेगळ्या धाटणीचा चित्रपटाचा आनंद आपल्याला 23 जून पासून आपल्या जवळच्या प्रेक्षकगृहात घेता येईल. मंत्रमुग्ध करणारे चित्रपटाचे संगीत प्रथमेश ढोंगडे व अमर देसाई यांनी दिले आहे. तर चित्रपटात समृद्धी शिमगे, रोहित हंचाटे, सयाजी शिंदे, शक्ती कपूर, अतुल परचुरे, राखी सावंत, स्वप्नील राजशेखर, भक्ती चव्हाण, जयराज नायर, विद्या साबळे, राजू पाटील, हर्षा गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

डिके शर्मा हे या चित्रपटाचे डीओपी आहेत. चित्रपटाचे डिस्ट्रिब्युशन एनडी 9 यांनी केले आहे. चित्रपटाच्या सोशल मीडिया दवंडी मीडिया व पब्लिसिटी लॉजिस्टीकची जबाबदारी विनायक धालवडे यांनी पार पाडली आहे. विजय वामनराव यांनी चित्रपटाचं संकलन केलं आहे.या चित्रपटाच्या पब्लिक रिलेशनचे काम अमोल वाघमारे यांनी केले असून रचना हंचाटे यांनी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...