First Indian Idol Winner : इंडियन आयडॉन स्पर्धा जेंव्हा सुरु झाली तेंव्हापासून ती गाजत आली आहे.
गायक आणि गायिका आपापली कला सादर करून मतांच्या आधारावर जिकून येतात. पहिली स्पर्धा 2004 मध्ये झाली.
त्या स्पर्धेत मराठमोळा अभिजित सावंत विजेता ठरला. आज 7 ऑक्टोबर वाढदिवस आहे त्याचा.
First Indian Idol Winner Abhijeet Sawant : अभिजीत सावंत विषयी थोडीशी माहिती
अभिजीत सावंत हा एक भारतीय गायक, टेलिव्हिजन अभिनेता, अँकर आणि इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनचा विजेता आहे.
त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1981 रोजी मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे झाला.
चेतना कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी घेतल्यानंतर, सावंत संगीत क्षेत्रात सामील होण्यास आणि काम करण्यास उत्सुक होता.
First Indian Idol Winner : भारताचा पहिला इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेता
2004 मध्ये, त्याने इंडियन आयडॉलच्या पहिल्या सत्रात भाग घेतला आणि स्पर्धा जिंकली.
त्याचा पहिला अल्बम “आपका अभिजीत सावंत” 7 एप्रिल 2005 रोजी प्रसिद्ध झाला.
अल्बमला व्यावसायिक यश मिळाले आणि त्याची “मोहब्बतें लुटौंगा” आणि “लफझोन में” सारखी गाणी त्या वर्षाच्या शेवटी चार्टबस्टर बनली.
आशिक बनाया आपने या चित्रपटात पार्श्वगायनही केले. 2008 मध्ये स्टार प्लसवरील क्लिनिक ऑल क्लियर जो जीता वही सुपरस्टार ह्या स्पर्धेतही अभिजित फायनलिस्ट होता.
हा शो भारतीय टेलिव्हिजनवरील विविध सिंगिंग रिएलिटी शोचे विजेते आणि उपविजेते यांच्यातील स्पर्धा होती. सावंत या शोचा पहिला उपविजेता ठरला.
त्याने 2013 मध्ये त्याचा तिसरा स्टुडिओ अल्बम रिलीज केला ज्याचे शीर्षक होते फरीदा.
अभिनय क्षेत्रात पदार्पण
अभिजतने 2009 मध्ये लॉटरी या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
तीस मार खान चित्रपटाच्या शेवटी एक छोटीशी भूमिका पण केलेली. रोमँटिक ड्रामा मालिका कैसा ये प्यार है आणि थ्रिलर क्राईम सीरिज C.I.D मध्ये त्याने स्वतःची खास भूमिका साकारली होती.