Saturday , 14 September 2024
Home कर काड्या Welcome 3 : वेलकम 3 मध्ये अनिल कपूर-नाना पाटेकर ही जोडी नसणार.
कर काड्याकर क्लिक

Welcome 3 : वेलकम 3 मध्ये अनिल कपूर-नाना पाटेकर ही जोडी नसणार.

Welcome 3
Welcome 3 : Sillytalk

Welcome 3 : 2007 साली आलेल्या वेलकमच्या (Welcome) पहिल्या भागाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

त्यानंतर अनिस बाझमी ह्या दिग्दर्शकाने वेलकमचा पुढला भाग म्हणजे वेलकम बॅक (Welcome Back) 2015 ला प्रेक्षकांच्या भेटीला आणला.

पहिला भाग अनेक अर्थाने हिट ठरला. सूर्य भागात तितकी मजा नाही आली प्रेक्षकांना तरीही तो बऱ्यापैकी चालवला.

आता तिसऱ्या भागाची जुळवाजुळव करताना दोन मुख्य कलाकार बदलून वेलकम 3 येतो आहे.

म्हणजेच वेलकम 3 मध्ये आता अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नाना पाटेकर (Nana Patekar) ही जोडी आपल्याला पाहायला मिळणार नाही.

Welcome 3 : कोण घेणार या दोघांची जागा?

वेलकम 3 मध्ये अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्या जागी संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांची वर्णी लागली आहे.

हेही वाचा : Banknotes with star symbol : ‘स्टार’ चिन्ह असलेल्या नोटा कायदेशीर आहेत का?

प्रोडक्शन हाऊस कडून काही करणे जी दिली गेली ती जरा विस्तृतपणे खाली देत आहोत.

Welcome 3 : …म्हणून संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची वर्णी

अनिल कपूर आणि नाना पाटेकर हे दोघेही अत्यंत व्यस्त असलेले अभिनेते आहेत. त्यामुळे त्यांच्या तारखा अव्हेलेबल होत नव्हत्या.

त्यामुळे फिल्म चे शेड्युल पुढे पुढे जात होतं. म्हणून दुसरे कलाकार घेऊन चित्रीकरण करण्याचा निर्णय झाला.

येत्या तिसऱ्या भागासाठी नवीन व्यक्ती दिग्दर्शन करणार असल्याने चित्रपट निर्मात्यांनी वेलकम 3 ला (Welcome 3) एका नवीन दिशेने नेण्याचा निर्णय घेतला.

संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) चित्रपटाच्या नवीन प्रकारच्या वेलकम साठी अधिक योग्य आहेत.

अर्थात कारण काहीही असो, हे स्पष्ट आहे की संजय दत्त आणि अर्शद वारसी वेलकम 3 अधिक आकर्षक आणि एन्टरटेनिंग करण्यासाठी उत्सुक आहेत.

या दोघांनी यापूर्वी यशस्वी कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि ते फ्रँचायझीमध्ये त्यांची वेगळी केमिस्ट्री आणतील याची खात्री आहे.

वेलकम 3 मधील सहभागाबद्दल हे अभिनेते काय म्हणाले :

संजय दत्त :
“वेलकम 3 मध्ये सहभागी होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. मी ह्या सिनेमाचा नेहमीच चाहता राहिलेलो आहे, आणि अर्शद आणि इतर कलाकारांसोबत काम करण्यास सुद्धा उत्सुक आहे.”

अर्शद वारसी :
“वेलकम 3 ह्या वेलकम फ्रँचायझीचा भाग बनून मी आनंदित झालो आहे. मी याआधी फिरोज नाडियादवालासोबत काम केले आहे आणि तो एक उत्तम निर्माता आहे. मी पुन्हा संजय दत्तसोबत काम करण्यास उत्सुक आहे. आमच्याकडे खूप काही आहे. आमच्यातली केमेस्ट्री उत्तम असल्याने असे वाटते की आम्ही काहीतरी खास तयार करू शकू.”

आता प्रेक्षक म्हणून आपल्याला वेलकम 3 फ्रँचायझीची वाट पाहावी लागेल. हा सिनेमा चाहत्यांसाठी हिट ठरेल की फ्लॉप हा कालच ठरवेल. संजय दत्त आणि अर्शद वारसी हे बॉलिवूडमधील दोन कसलेले कलाकार आहेत आणि ते चित्रपटात काय मजा आणतात हे पाहण्यासाठी प्रेक्षक म्हणून आपण सर्वच उत्सुक आहोत.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...