Nitin Desai Suicide : भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
नितीन देसाई 58 वर्षांचे होते. त्यांच्या या आत्महत्येने कलाविश्वात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली.
एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले.
त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती.
Nitin Desai Suicide : नितीन देसाई कोण होते?
नितीन देसाईंनी शून्यातून विश्व् निर्माण केलं होत. त्यांना खरा ब्रेक 80च्या दशकात मिळाला होता.
‘1942 अ लव्ह स्टोरी’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्या करियरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती.
गेल्या 30 वर्षात त्यांनी कला दिग्दर्शन क्षेत्रात अमूल्य असं काम केलं आहे. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये कला कलादिग्दर्शनाची धुरा योग्य रित्या सांभाळलेली होती.
Nitin Desai Suicide : अनेक मोठ्या चित्रपटांसाठी काम –
नितीन देसाई .’1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये कलादिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली होती.
Nitin देसाईंचा मराठी आणि हिंदी सिनेक्षेत्रात मोठं नाव होत. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी राजकीय सेट सेखील उभारले होते.
नितीन देसाईंनी तब्बल 250 जाहिराती, 180 चित्रपट आणि सुमारे 100 टीव्ही शोमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम केलं होत.
तसेच त्यांना 4 राष्ट्रीय आणि 9 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
मोदींनीही केले होते त्यांच्या कामाचे कौतुक
2003 मध्ये नितीन देसाईंनी नरेंद्र मोदी यांच्या एका इव्हेंटसाठी कमळाचा मोठ्या भव्य दिव्या सेट उभारला होता.
त्या सेटला पाहून नरेंद्र मोदी खूप प्रभावित झाले होते. तसेच त्या कार्यक्रमाच्या काही दिवसांनी नरेंद्र मोदींनी नितीन देसाईंना फँन करून भेटायला बोलावलं होत.
असा किस्सा स्वतः नितीन देसाईंनी एका मुलाखती दरम्यान सांगितला होता.