Wednesday , 4 December 2024
Home वाच ना भो Upcoming Movies : येणाऱ्या काळातले बॉलिवूडचे काही सिनेमे
वाच ना भो

Upcoming Movies : येणाऱ्या काळातले बॉलिवूडचे काही सिनेमे

Upcoming Movies
SillyTalk Update

Upcoming Movies : बॉलिवूडच्या गदर 2 आणि जवान ह्या तुफानी हिट सिनेमानंतर आता अजून नवीन सिनेमांची लाट येणार आहे.

सणासुदीच्या काळात बऱ्याच चित्रपटांची लाट येणार आहे. हिट्स ची संख्या वाढणार असं दिसतंय.

‘जवान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. यानंतर बॉक्स ऑफिसवर चित्रपटांचं वादळ येणार आहे.

येणाऱ्या वर्षात 11 बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित होणार असून या सर्व चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Upcoming Movies : काही सिनेमे जे येत्या काळात बॉक्स ऑफिसला धुमाकूळ घालू शकतील.

भजनकुमार ह्या नायकाची कहाणी म्हणजे द ग्रेट इंडियन फॅमिली नावाचा सिनेमा.

यशराज फिल्म्सचा हा सिनेमा आहे. विकी कौशल आणि मानुषी छिल्लर ह्यांची भूमिका असलेला हा सिनेमा.

कोविड काळात वॅक्सीन बद्दल प्रचंड चर्चा होती. भारताने स्वतः ट्रायल्स घेऊन वॅक्सीन तयार केले. त्याची कहाणी म्हणजे नाना पाटेकर अभिनित द वॅक्सीन वॉर.

फुकरे ३ येतो आहे आता पडद्यावर. फुकरे १ आणि २ च्या सिरींजमधला हा तिसरा सिनेमा. पहिल्या दोन्ही सिनेमांनी तरुणांमध्ये लोकप्रियता मिळवलेली.

राजश्री फिल्म्सचा दोनो नावाचा सिनेमा येतोय. करण देओल आणि पालोमा ह्या दोघांचा सिनेमा. टिपिकल राजश्री बडजात्या फिल्म असेल ही.

यशराजच्या फ्रँचायझी सिनेमांपैकी एक टायगर सिरीज मधला टायगर ३ येतो आहे. सलमान खान अभिनित सबकुछ भाईजान असणारा सिनेमा.

रोमँटिक आणि लव्हरबॉय इमेज तोडून धुमाकूळ घालायला देमार पट सिनेमा घेऊन येतोय रणबीर कपूर. ऍनिमल नावाचा सिनेमा येतोय ज्याच्या पोस्टरवर रणबीर कपूर अँग्री यंग लुक्स मध्ये दिसतोय.

सॅम माणेकशॉ ह्यांच्यावर असलेला विकी कौशल प्रमुख भूमिकेत असलेला सिनेमा म्हणजे सॅम बहादूर. तो ही सिनेमा लवकरच येणार आहे.

वर्षाच्या शेवटी पुन्हा एकदा शाहरुख. Dunki नावाचा राजकुमार हिरानीचा सिनेमा घेऊन शाहरुख पुन्हा दंगा करतो की नाही ते पाहायचा आहे.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...