Thursday , 30 May 2024
Home वाच ना भो Movie in just Rs.99 on 13 Oct : 13 ऑक्टोबरला सिनेमा केवळ 99 रुपयात.
वाच ना भो

Movie in just Rs.99 on 13 Oct : 13 ऑक्टोबरला सिनेमा केवळ 99 रुपयात.

Movie in just Rs.99 on 13 Oct
Movie in just Rs.99 on 13 Oct : Sillytalk

Movie in just Rs.99 on 13 Oct : यंदाच्या वर्षी भारतात राष्ट्रीय चित्रपट दिन 13 ऑक्टोबर 2023 रोजी साजरा केला जाईल.

मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) ने जाहीर केले आहे, की चित्रपटाची तिकिटे (National Cinema day Ticket Price) रु. 99/- इतक्या कमी किमतीत उपलब्ध असतील.

हा विशेष दिवस थिएटरची उपस्थिती वाढवण्यासाठी आणि विविध चित्रपटांच्या यशात दिलेल्या योगदानाबद्दल चित्रपट प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो.

Movie in just Rs.99 on 13 Oct : कोणकोणत्या स्क्रीन्सवरती 99 रुपयांत सिनेमा पाहू शकता?

PVR, Inox, Cinepolis, Miraj, Citypride, Asian, Mukta A2, Movie Time, WAVE, M2K, Delite आणि इतर सारख्या लोकप्रिय मल्टिप्लेक्स थिएटर्सच्या 4 हजारहून अधिक स्क्रीन या वार्षिक उत्सवात सहभागी होतील.

तथापि, ही 99 रुपयेवाली ऑफर IMAX, 4DX, किंवा Recliner Seats सारख्या प्रीमियम फॉरमॅटवर उपलब्ध नसेल.

हेही वाचा : iPhone15 – नवीन आयफोन आला आयफोन आला आयफोन आला

Why is National Film Day celebrated? : का साजरा केला जातो हा दिवस?

विशेष दिवस साजरा करण्यामागे भारतीय सिनेमाची प्रेरणा आहे. अश्या प्रसंगी सर्व वयोगटातील प्रेक्षकांना सिनेमाच्या आनंदाच्या दिवसासाठी एकत्र आणले जाते.

सिनेमा भारतीयाच्या नसानसात भिनलाय. बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांच्या अतुलनीय यशाचा उत्सव साजरा करावा ह्यासाठी हा दिवस ठरवलं जातो.

MAI म्हणजे मल्टिप्लेक्स असोसिएशनने तयार केलेल्या निवेदनात आवाहन केले आहे की सर्वानी ह्या दिवसासाठी एकत्र येऊन आपल्या सिनेमाना बळ द्यावं.

हेही वाचा : Ganpati Bappa’s 8 Songs in Bollywood : गणपती बाप्पाची बॉलिवूड मधली 8 गाणी

“या यशात योगदान देणाऱ्या सर्व चित्रपटप्रेमींचे मनापासून ‘धन्यवाद’ आहे आणि जे लोक त्यांच्या स्थानिक सिनेमाकडे परतले नाहीत त्यांना आमंत्रण देण्यासाठी हा दिवस आहे.”

Movie in just Rs.99 on 13 Oct : मागच्या वर्षी 75 रुपये तिकीट

गेल्या वर्षी जागतिक स्तरावर राष्ट्रीय चित्रपट दिनाची सुरुवात झाली, तिकिटांच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न केले गेले.

गेल्या वर्षीपासून 75 रुपये किंमतीत सिनेमा दिवस साजरा केला गेला,

ज्यामध्ये 6.5 दशलक्ष लोकांनी सकाळी 6 वाजता प्रदर्शित होणाऱ्या शोसाठी थिएटरमध्ये गर्दी केली होती.

अशीच उत्साही मंडळी ह्यावर्षीदेखील 99 रुपयात सिनेमा बघायला येतील अशी आशा आहे.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...