Wednesday , 4 December 2024
Home कर क्लिक Best of Cricket Related Movies : क्रिकेटवर आधारित असलेले सिनेमे.
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Best of Cricket Related Movies : क्रिकेटवर आधारित असलेले सिनेमे.

Best of Cricket Related Movies
Best of Cricket Related Movies

Best of Cricket Related Movies : क्रिकेट हा खेळ भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे.

भारतामध्ये क्रिकेटची लोकप्रियता एवढी आहे की काही जणांसाठी क्रिकेट हा केवळ खेळ नसून एक धर्म आहे.

त्यामुळे क्रिकेटचे प्रत्येक इव्हेंट आपल्या इकडे सण उत्सव यांसारखे सेलिब्रेट होतात. त्यात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असेल त्याचा रोमांच एका वेगळ्याच उंचीवर जातो.

भारतामध्ये क्रिकेट प्रमाणे क्रिकेटवर बनवलेले सिनेमे देखील तितकेच गाजले आहे. काही सिनेमे खेळावर बनले आहेत तर काही खेळाडूंवर…

पण हे सर्वच सिनेमे भारतासह संपूर्ण जगभरात गाजले आहेत. क्रिकेटवर आधारित कोणकोणते सिनेमे गाजले आहेत? जाणून घेऊयात..

Best of Cricket Related Movies : क्रिकेट वर आधारित सिनेमे…

जर्सी (Jersey)

दाक्षिणात्य सिनेमा जर्सी या सिनेमावर आधारित जर्सी हा सिनेमा बॉलिवूड मध्येही बनविण्यात आला होता.

या सिनेमामध्ये शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये होते.या सिनेमाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केलं आहे.

हा सिनेमा 14 एप्रिल 2022 रोजी रिलीज झाला होता. आधी देखील असा सिनेमा पाहिल्यामुळे प्रेक्षकांनी या सिनेमाकडे पाठ फिरवली..

पण हा एक उत्तम सिनेमा आहे. हा सिनेमा प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.

Best of Cricket Related Movies : कौन प्रवीण तांबे? (Kaun Pravin Tambe?)

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेचा ‘कौन प्रवीण तांबे?’ हा सिनेमा 1 एप्रिल 2022 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.

हा सिनेमा एक बायोपिक असून हा क्रिकेटर प्रवीण तांबे यांच्या जीवनावर आधारित आहे.

‘कौन प्रवीण तांबे?’ ह्या सिनेमामार्फत प्रवीण तांबे यांचं क्रिकेटशी असलेलं प्रेम आणि त्यांचा जीवनातील संघर्ष ह्यावर या सिनेमाची स्टोरी आहे.

हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत हा सिनेमा तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) वर पाहू शकता.

Best of Cricket Related Movies : 83

नावाप्रमाणेच हा सिनेमा कपिल देव यांच्या नेतृत्वामध्ये भारताने जिंकलेल्या 1983 च्या विश्वचषकावर आधारित आहे.

सिनेमात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंहने साकारली आहे.

या व्यतिरिक्त सिनेमात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना मुख्य भूमिकेत आहे.

हा सिनेमा 24 डिसेंबर 2021 रोजी सिनेमागृहात रिलीज झाला होता.

हा सिनेमा तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) वर पाहू शकता.

Best of Cricket Related Movies : सचिन अ बिलियन ड्रीम्स (Sachin A Billion Dreams)

‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ (Sachin A Billion Dreams) हा सिनेमा क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आधारित आहे.

हा सिनेमा 2017 साली रिलीज झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 70 कोटी रुपयांची कमाई केली होती.

हा सिनेमा तुम्ही Sony LIV वर पाहू शकता.

एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी (MS Dhoni : The Untold Story)

‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ (MS Dhoni : The Untold Story) हा सिनेमा भारताचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी याच्यावर आधारित आहे.

‘M.S धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ (MS Dhoni : The Untold Story) हा सिनेमा 2016 साली प्रदर्शित झाला होता.

एम एस धोनी याची भूमिका दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी साकारली होती.

बॉक्स ऑफिसवर ह्या सिनेमाने 200 कोटींहून कधिक रुपयांचा गल्ला जमवला होता. हा सिनेमा तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) वर पाहू शकता.

Best of Cricket Related Movies : इकबाल (Iqbal)

(Iqbal) इकबाल क्रिकेट विषयीचा अतिशय सुंदर सिनेमा आहे. इकबाल (Iqbal) नावाची मुख्य भूमिका श्रेयस तळपदे यांची साकारली आहे.

इकबाल (Iqbal) हा फास्ट बॉलर असतो पण तो कर्णबधिर असतो. ह्यानंतर तो संघर्ष करून कसा एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचतो हे या सिनेमातून दाखवण्यात आलं आहे.

श्रेयस तळपदे व्यतिरिक्त या सिनेमामध्ये नसीरुद्दीन शाह, गिरिश कर्नाड मुख्य भूमिकेत आहेत. तसेच हा सिनेमा 2005 मध्ये रिलीज झाला होता.

लगान (Lagaan)

क्रिकेट या खेळावर आधारित लगान (Lagaan) हा एक Masterpiece सिनेमा आहे. 15 जून 2001 ला प्रदर्शित झाला होता.

अमीर खान (Amir Khan) मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. त्याकाळी ह्या सिनेमाने 53 कोटींचा गल्ला जमवला होता.

तसेच या सिनेमाला आयफा, फिल्मफेअर सारखे आंतराष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले होते. आजही हा सिनेमा आवर्जून पाहिला जातो.

इनसाइड एज : Inside Edge

इनसाइड एज (Inside Edge) ही एक अफलातून वेबसिरीज आहे.

क्रिकेट वर लागणारा सट्टा (Betting on cricket) मॅच फिक्सिंग (Match fixing) कशी केली जाते? त्याच्याशी निगडित असलेली गुन्हेगारी यावरती ही वेबसिरीज आधारित आहे.

आत्तापर्यंत इनसाइड एज (Inside Edge) या वेबसिरीजचे Inside Edge 3 सिझन आले आहेत.

इनसाइड एज (Inside Edge) या वेबसिरीजचे तीनही सिझन तुम्ही प्राईम व्हिडिओवर (Prime Video) पाहू शकता.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...