Anil Kapoor 40 years in cinema : धीना धीन धा… ए जी ओ जी लो जी सुनो जी….गेली चाळीस वर्षे आपल्या अभिनयाने, आपल्या सुपरहिट गाण्यांनी लोकांना वेड लावणारा अभिनेता अनिल कपूर.
अनिल कपूरने 23 जून 2023 रोजी चित्रपटसृष्टीतील त्यांचे 40 वे वर्ष साजरे (Anil Kapoor completes 40 years in cinema) केले.
चाळीस वर्षांपासून तो सिनेमात कामं करतोय.
Anil Kapoor 40 years in cinema : अनिल कपूरने शेअर केला व्हिडीओ…
चाळीस वर्षांपूर्वी अनिलचा “वो सात दिन” नावाचा पहिला सिनेमा प्रदर्शित झालेला.
हेही वाचा : स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना; स्टार्टअपसाठी ही योजना का आहे फायदेशीर? जाणून घ्या
त्या चित्रपटातील स्वतःचा एक व्हिडिओ त्याने Instagram शेअर केला आहे. त्या व्हिडिओ खाली त्याने त्याच्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार मानले आहेत.
एवढी वर्षे प्रेम केल्याबद्दल लोकांचे आभार मानलेच पाहिजेत असं अनिल म्हणाला.
इंस्टाग्राम पोस्टमध्ये अनिल कपूरने म्हटले आहे की मी “विश्वास ठेवू शकत नाही” की मला पदार्पण करून 40 वर्षे झाली आहेत.
मला मिळालेल्या सर्व संधींसाठी मी “कृतज्ञ” आहे आणि भविष्यात काय वाढून ठेवलं आहे आहे हे पाहण्यासाठी “उत्साहित” सुद्धा आहे.
चाहत्यांकडून मिळालेले प्रेम आणि पाठिंबा पाहून अनिल भारावून गेलेला आहे.
भारतीय चित्रपट उद्योगाचा एक भाग असल्याचा मला “अभिमान” आहे आणि आगामी वर्षांमध्ये आणखी उत्कृष्ट चित्रपट बनवण्यासाठी मी “कटीबद्ध” आहे, असेही अनिल कपूरने इन्स्टा पोस्टमध्ये म्हंटल आहे.
अनिल कपूरने इंस्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टचा अंशतः भाग इथे देत आहे :
“वो सात दिन मधून मी पदार्पण करून 40 वर्षे झाली आहेत, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. असे वाटते की, कालच मी सुरुवात केली आहे. स्वप्ने आणि महत्वाकांक्षा अजूनही वाढत्या आहेत. मला मिळालेल्या सर्व संधींबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या चाहत्यांच्या प्रेमासाठी आणि मला दिलेल्या पाठिंब्यासाठी मी आभारी आहे. माझ्यासोबत या प्रवासात असल्याबद्दल धन्यवाद!”
अनिल कपूर हा भारतातील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे.
100 हून अधिक चित्रपटांमध्ये अनिलने भूमिका केल्या आहेत आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक पुरस्कार देखील मिळवले आहेत.
अनिल अष्टपैलुत्वासाठी आणि आजवर साकारलेल्या विविधांगी भूमिकांसाठी ओळखला जातो. तो एक यशस्वी निर्माता आणि व्यावसायिक देखील आहे.
अनिलला पुढील प्रवासासाठी SillyTalk तर्फे शुभेच्छा!!
वन टू का फोर….फोर टू का वन
We Love You Lakhan