Thursday , 21 November 2024
Home वाच ना भो Songs of N D Mahanor : आम्ही ठाकर ठाकर ते जांभूळ पिकल्या झाडाखाली यांसारखे गाणे लिहिणारा निसर्गकवी हरपला.
वाच ना भो

Songs of N D Mahanor : आम्ही ठाकर ठाकर ते जांभूळ पिकल्या झाडाखाली यांसारखे गाणे लिहिणारा निसर्गकवी हरपला.

Songs of N D Mahanor
Songs of N D Mahanor : Sillytalk

Songs of N D Mahanor : प्रसिद्ध प्रसिद्ध निसर्गकवी ना धों महानोर यांचं दीर्घ आजाराने आज सकाळी दुःखद निधन झालं आहे.

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने एवढ्या साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.

त्यांच्यावर उद्या त्यांच्या मूळगावी पळसखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

रानकवी म्हणून प्रसिद्ध :

मराठी साहित्यामध्ये ना धों महानोर हे रानकवी म्हणून प्रसिद्ध होते. तसेच त्यांना निसर्गकवी देखील म्हटलं जायचं.

त्यांनी ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘रानातल्या कविता’ गाण्यांमधून पळसखेडची मराठवाडी लोकगीते प्रसिद्ध केली. एवढंच नाही तर त्यांनी अनेक चित्रपांसाठी देखी गाणी लिहिली आहेत.

Songs of N D Mahanor :ना. धों. महानोर यांची गाणी

ना. धों. महानोर यांनी 70 ते 80 च्या दशकामध्ये काही मोजक्या चित्रपातांसाठी गाणी लिहिली होती. ही गाणी आजही अजरामर आहेत.

ह्यामध्ये “जैत रे जैत” या 1977 मध्ये आलेल्या चित्रपटातील गाणी ना. धों. महानोर यांनी लिहिली होती.

हेही वाचा : 5 Best Teas for Diabetics People : हाय डायबेटीस असलेल्यांसाठी चहाचे 5 सर्वोत्तम प्रकार.

“जैत रे जैत” या चित्रपटातील मी रात टाकली, नभं उतरु आलं,आम्ही ठाकर ठाकर,जांभूळ पिकल्या झाडाखाली, असं एखादं पाखरु वेल्हाळ,डोंगर काठाडी ठाकरवाडी ही गाणी आजही आवडीने ऐकली जातात.

यासोबतच ‘सर्जा’ चित्रपटामधील चिंब पावसाने रान झालं आबादानी, मी काट्यातून चालून थकले, अजिंठा या चित्रपटामधील डोळ्यांना डसले पहाड, चिंब झाली, मन चिंब पावसाळी, बगळ्या बगळ्या फुलं दे हे गाणे देखील विशेष गाजले होते.

तसेच एक होता विदूषक, अबोली, मुक्ता, दोघी या चित्रपटांमधील गाणी देखील ना. धों. महानोर यांनी लिहिली आहे.

Songs of N D Mahanor : ना. धों. महानोर यांचे हे कवितासंग्रह प्रसिद्ध :

ना. धों. महानोर यांच्या जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता, गंगा वाहू दे निर्मळ,गावातल्या गोष्टी या कविता कथासंग्रहांना देखील वाचकांमध्ये आजही प्रसिद्ध आहेत.

एकंदरीत ना. धों. महानोर यांच्या जाण्याने संपूर्ण साहित्यविश्वात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

पण त्यांनी पाठीमागे सोडलेला साहित्याचा ठेवा हा नेहमीच त्यांची आठवण करून देईल.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...