Tarla Movie : तरला सिनेमा आहे एका स्वयंपाक करणाऱ्या स्त्री शेफविषयी. अशी स्त्री शेफ जी भारतातली सर्वात लोकप्रिय आणि अनेकांना प्रेरणा देणारी शेफ होती.
तरला दलाल ह्यांच्यावरील आगामी बायोपिकचा ट्रेलर, मार्च 2023 मध्ये रिलीज झाला. अनेकांनी ह्या चित्रपटाची कल्पना नव्हती केलेली.
पण ट्रेलर जसा आला तसं अनेकांनी तारीफ केली. चित्रपटात अभिनेत्री हुमा कुरेशी तरला ह्यांच्या भूमिकेत आहे तर पियुष गुप्ता ह्यांनी सिनेमा दिग्दर्शित आहे.
Tarla Movie : स्टोरी काय आहे?
ट्रेलरमध्ये तरला ह्यांच्या गृहिणी असल्यापासून ते प्रसिद्ध कूकबुक लेखक आणि टेलिव्हिजन स्टार होण्यापर्यंतच्या प्रवासाची झलक दिसते.
हेही वाचा : गेल्या 2 महिन्यांतील भारतातील टॉप ट्रेंडिंग फोन; कोणते आहेत ‘हे’ फीचर्स फोन? जाणून घ्या.
त्यांना असलेली स्वयंपाकाची आवड आणि लग्नानंतरचा कौटुंबिक जीवनाचा समतोल साधण्यासाठी होणारी धडपड आपल्याला सिनेमात दिसते.
भारतातील सर्वात लोकप्रिय शेफ, लोकप्रिय टीव्ही स्टार बनण्यात त्यांना अखेरचे यश मिळते, असा एकूण सिनेमा आहे.
ट्रेलर पाहा :
या ट्रेलरला समीक्षक आणि चाहत्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. हुमा कुरेशीच्या अभिनयाची प्रशंसा करण्यात आली असून, तरलाच्या जीवनातील चित्रणाला तिने ‘प्रेरणादायी’ म्हटले आहे.
“तरला” हा सिनेमा झी-5 वर (Zee 5) येत्या 7 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
Tarla Movie : ह्या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये जाणवलेल्या काही महत्वाच्या गोष्टी –
तरला दलालच्या भूमिकेत हुमा कुरेशीचा अभिनय सहज सुंदर आणि प्रेरणादायी आहे.
एक गृहिणी म्हणून तरलाच्या सुरुवातीच्या जीवनाची आणि कुक-बुकची लेखक आणि टेलिव्हिजन स्टार म्हणून तिला मिळालेल्या यशाची झलक ट्रेलरमध्ये दिसते.
तारकांच्या कौटुंबिक जीवनात आणि कारकिर्दीत संतुलन राखणे आणि पतीकडून होणाऱ्या टीकेला तरलाचे सामोरे जाणे ह्या गोष्टी मध्ये होणारी कसरत दिसते.
ट्रेलरचा शेवट प्रेरणादायी संदेशासह होतो आणि प्रेक्षकांना त्यांच्या स्वप्नांना पुन्हा सत्यात उतरवण्यासाठी प्रोत्साहित करतो.
पुढल्या महिन्यात हा सिनेमा रिलीज झाल्यावर पाहायला विसरू नका.