Sunday , 15 September 2024
Home कर क्लिक Kapil Sharma show closing down? : कपिल शर्मा शो बंद होतोय?
कर क्लिक

Kapil Sharma show closing down? : कपिल शर्मा शो बंद होतोय?

Kapil Sharma show closing down?
Kapil Sharma show closing down? : Sillytalk

Kapil Sharma show closing down? : सिनेमाच्या प्रमोशन्ससाठी हक्काचा प्लॅटफॉर्म म्हणून कपिल शर्मा शो ओळखला जातो.

सिनेमे, त्यातले कलाकार, सेलिब्रिटी, राजकारणी, समाजकारणी, खेळाडू ह्या सगळ्यांना कधी ना कधीतरी आपण ह्या शोवर पहिले असेलच.

अनेक जण ह्या शोवर येण्यासाठी प्रयत्न करतात असेही आपण ऐकले असेल.

आधी सिद्धू, आता अर्चनापुरणसिंग तसेच किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, अली असगर, सुनील ग्रोवर अश्या अनेक प्रतिभावान ह्या कलाकारांमुळे हा शो प्रेक्षकांना कायम हसवत राहिला.

एप्रिल 2016 रोजी पहिल्या सीझनचा पहिला भाग प्रसारित झालेला.

Kapil Sharma show closing down? : कपिल शर्मा शो बंद होतोय?

पण हा शो आता बंद होतोय … होय, कपिल शर्मा शो बंद होणार आहे. पण तात्पुरता बंद होणार आहे.
शोचा शेवटचा भाग येत्या काही दिवसातच प्रसारित होईल.

Byju’s विषयी थोडेसे ..; Byju’s या स्टार्टअपची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या.

शोच्या निर्मात्यांनी सांगितले की, शोची “पुनर्रचना” करण्यासाठी आम्ही ब्रेक घेत आहेत.

का बंद होतोय शो :

कपिल शर्मा आपल्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेतो आहे. तसेच तो एक चित्रपट आणि वेब सीरिजसह इतर काही प्रोजेक्टवरही काम करत आहे.

कपिल गेल्या काही वर्षांपासून नॉन-स्टॉप काम करत आहे. शो होस्ट करत आहे, चित्रपटांचे शूटिंग करत आहे आणि लाइव्ह शो करत आहे.

त्याचे लग्न झाले असून त्याला एक मूल आहे. त्याला आपल्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायचा आहे.

द कपिल शर्मा शो हा भारतातील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो आहे. गेल्या 7 वर्षांहून अधिक काळ चालू असलेला आणि अनेक पुरस्कार ह्या शो ने जिंकलेले आहेत.

सेलिब्रिटी पाहुणे आणि चित्रविचित्र विनोदांमुळे हा शो ओळखला जातो.

शोची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या ह्या शोचा फॉरमॅट शिळा झाला आहे. निर्मात्यांना शोची पुनर्रचना करून काही नवीन प्रकार समोर आणायचा आहे.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...