Yash Rocky Bhai : ‘रॉकिंग स्टार’ म्हटला जाणारा अभिनेता यशला आता कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.
केजीएफपासून त्याचे जगभरात चाहते वाढले आहेत. यशचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील भुवनहल्ली या छोट्याशा गावात झाला.
यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा असून त्याचे वडील सरकारी बस चालक आहेत.
यशला लहानपणापासूनच सिनेविश्वात काहीतरी करायचं होतं, म्हणून तो घरून 300 रुपये घेऊन हैदराबादला आला आणि प्रयत्न करू लागला.
पण तेव्हा हा मुलगा एके दिवशी कन्नड चित्रपटसृष्टीला जागतिक ओळख मिळवून देईल, असे कुणालाही वाटले नसेल.
चला, तर यशबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या काही गोष्टी जाणून घेऊयात…
Yash Rocky Bhai : यशची लव्हस्टोरी :
यशच्या पत्नीचे नाव राधिका पंडित असून दोघांचीही कथा एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही.
स्ट्रगलच्या दिवसांमध्ये शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांना भेटले आणि हळू-हळू कथा पुढे सरकू लागली.
या दोघांची पहिली भेट 2004 मध्ये टीव्ही शो नंदागोकुलाच्या सेटवर झाली होती. यशने राधिकाला फोनवर प्रपोज केले होते,
हेही वाचा : IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज
ज्याचे उत्तर त्याला 6 महिन्यांनी मिळाले. यश आणि राधिकाने 9 डिसेंबर 2016 रोजी बंगळुरूमध्ये लग्न केले.
राधिका आणि यशला दोन मुले आहेत, एक मुलगा यथार्थ आणि मुलगी आयरा. हे चौघे आता बंगळुरूच्या विंडसर मनोरजवळील प्रेस्टिज अपार्टमेंटमध्ये एकत्र राहतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशची एकूण संपत्ती 57 कोटी रुपये आहे आणि केजीएफ 2 साठी यशला 30 कोटी फी मिळाली होती.
कार आणि घड्याळांचा शौकीन :
यशला आलिशान कार आणि घड्याळे खूप आवडतात. सर्वप्रथम, जर आपण यशच्या कार कलेक्शनबद्दल बोललो, तर त्याच्याकडे रेंज रोव्हर इव्होक आहे.
ज्याची सध्याची किंमत 60 ते 80 लाख रुपये आहे. याशिवाय, एक Mercedes-Benz 5-सीटर GLC 250D Coupe आहे.
ज्याची किंमत सुमारे 78 लाख रुपये आहे आणि दुसरी Mercedes-Benz 7-सीटर Benz GLS 350D लक्झरी SUV कार आहे, ज्याची किंमत सुमारे 85 लाख रुपये आहे.
कार्स व्यतिरिक्त, आता यशच्या घड्याळाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्याकडे सुमारे 17 लाख रुपये किमतीचे रोलेक्स GMT मास्टर II, सुमारे 18 लाख रुपयांचे ऑडिमर्स पिगेट रॉयल ओक क्रोनोग्राफ आणि सुमारे 5 लाख रुपये किमतीचे ब्रेटलिंग सुपरओशन हेरिटेज 42 आहे.