Wednesday , 4 December 2024
Home कर क्लिक Uorfi Javed : उर्फी जावेदला कपड्याचं एवढं वावडं का? स्वतःच सांगितलं Special कारण…
कर क्लिक

Uorfi Javed : उर्फी जावेदला कपड्याचं एवढं वावडं का? स्वतःच सांगितलं Special कारण…

Uorfi Javed : उर्फी जावेदला कपड्याचं एवढं वावडं का? स्वतःच सांगितलं Special कारण…
Uorfi Javed : Sillytalk

Uorfi Javed : अभिनेत्री (Actor) आणि मॉडेल उर्फी जावेद (model Uorfi Javed) तिच्या तोकड्या पोशाखांमुळे नेहमीच चर्चेत असते.

अनेक वेळा तिने न्यूड आणि टॉपलेस पोजही दिल्या आहेत. या कृत्यांमुळे उर्फीला अनेकदा सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून ट्रोल केले जाते.

तिच्या पेहरावामुळे लोक तिला बरे-वाईट सुनावून मोकळे होतात. अनेकाद तिच्यावर तरुण पिढी बिघडवल्याचा आरोप केला जातो.

उर्फीने एक व्हिडिओ शेअर करत कपडे न घालण्याचे कारण सांगितले आहे.

उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडिओ क्लिप आणि फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती दाखवते आहे की तिच्या हातावर आणि पायावर पुरळ कसे बाहेर आले आहे.

उर्फीच्या म्हणण्यानुसार, कपड्यांच्या ऍलर्जीमुळे हे घडले. अभिनेत्रीने प्रथम तिच्या पायाचा फोटो शेअर केला आणि विचारले, “हिवाळ्यात अशी ऍलर्जी होते का? तिने हो किंवा नाही असे पर्याय दिले आहेत. याच्या पुढे तिने एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये ती म्हणत आहे.

जेव्हा मी लोकरीचे कपडे किंवा पूर्ण कपडे घालतो तेव्हा हे (शरीरावर पुरळ) होते. जणू काही माझ्या शरीराला कपड्याची ऍलर्जी आहे. मित्रांनो, ही एक गंभीर समस्या आहे.

Uorfi Javed उर्फी पुढच्या व्हिडिओमध्ये मेक-अप करत आहे, म्हणते, “मग मित्रांनो, मी कपडे का घालत नाही हे आता तुम्हाला समजले असेल. कारण माझी प्रकृती गंभीर आहे.

जेव्हा मी कपडे घालतो तेव्हा माझे शरीर अशी प्रतिक्रिया देते.

प्रूफ पहा. मी तोकडे कपडे का घालते. तर माझ्या शरीराला कपड्यांची ऍलर्जी आहे.

यानंतर, दुसर्‍या व्हिडिओमध्ये उर्फीने तिच्या हातावर आणि पायावर पुरळ दाखवले आणि पुन्हा दावा केला की तिला कपडे घातल्यानंतर समस्यांचा सामना करावा लागतो.

Uorfi Javed : माझ्या शरीराला कपड्याची ऍलर्जी आहे.

तोकड्या कपडे घालण्याच्या कारणांचा खुलासा करणारा उर्फीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

यावर लोकांनी विविध प्रकारे कमेंट करत तिला अनेक सल्ले देखील दिले. एकाने डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला.

एकाने विनोद केला की ही ऍलर्जी नाही, तिने मच्छरदाणीचा ड्रेस घातला असावा.

तर तिसर्‍या युजरने लिहिले की तिने ब्लेड, मोबाईल, सेफ्टी पिन, बॅग इत्यादींनी बनवलेला ड्रेस घातला होता… आता आम्ही तिची वेदना समजू शकतो!

उर्फी खरी चर्चेत आली होती जेव्हा भाजप नेत्या आणि महाराष्ट्राच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा किशोर वाघ यांनी तिच्याविरुद्ध अश्लीलतेच्या कलमांखाली पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

त्यावेळी उर्फीने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून आपला राग काढला होता.

भाजप नेत्यांनी तिच्या संपत्तीचा आणि कमाईच्या साधनांचा तपशील दिल्यास ती तुरुंगात जाण्यास तयार असल्याचे म्हटले होते.

काहीही असो, उर्फीची फॅन फॉलोईंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

ट्रोलिंगच्या माध्यमातून असो किंवा इतर कोणतंही माध्यम उर्फी मात्र तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

एकिकडे ट्रोल होणारी उर्फी गुगल सर्चमध्ये देखील सर्वात आघाडीवर आहे.

यावरून हेच सिद्ध होते की, लोक तिच्याबाबत नेहमीच सर्च करत असतात.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...