Friday , 19 July 2024
Home कर क्लिक Tamil Film Industry : तमिळ सिनेमा इंडस्ट्री.
कर क्लिकवाच ना भो

Tamil Film Industry : तमिळ सिनेमा इंडस्ट्री.

Tamil Film Industry
Tamil Film Industry : Sillytalk

Tamil Film Industry : तामिळनाडू राज्यातला सिनेमा, तमिळ भाषेतला सिनेमा. ह्या इंडस्ट्रीला कॉलीवूड (Kollywood film industry) नावानेही ओळखले जाते.

भारतातील सर्वात प्रभावशाली फिल्म इंडस्ट्रीपैकी कॉलीवूड (Kollywood) आहे. तामिळनाडू आणि जगाच्या इतर भागात 70 दशलक्षाहून अधिक लोक तमिळ भाषा बोलतात.

त्यामुळे ह्या सिनेमाला एक वेगळी लोकप्रियता आहे. तमिळ सिनेमाचा समृद्ध असा इतिहास आहे.

History of Tamil Film Industry : तमिळ फिल्म इंडस्ट्रीचा इतिहास –

तमिळ सिनेमाचा इतिहास 1918 पासूनचा आहे. कीचका वधम हा पहिला मूक चित्रपट आर. नटराज मुदलियार यांनी दिग्दर्शित केला होता.

हेही वाचा : How to Choose the Right Laptop? : कसा लॅपटॉप विकत घेतला पाहिजे?

पहिला तमिळ बोलपट कालिदास १९३१ मध्ये प्रसिद्ध झाला. तेव्हापासून, तमिळ सिनेमाने सामाजिक वास्तववाद, मेलोड्रामा, कॉमेडी, ऍक्शन, रोमान्स, संगीत आणि थ्रिलर ह्या कॅटेगरीतले अनेक हिट सिनेमे दिले आहेत.

Famous producers of Kollywood film industry : तमिळ फिल्म इंडस्ट्रीमधील फेमस निर्माते :

तमिळ सिनेमाला आकार देणारे काही दिग्गज चित्रपट निर्माते म्हणजे एस. एस. वासन, ए. पी. नागराजन, के. बालचंदर, भारतीराजा, मणिरत्नम, बाळू महेंद्र आणि शंकर.

Famous Actors of Tamil Film Industry : तमिळ फिल्म इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेते :

तमिळ सिनेमाने भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेते आणि अभिनेत्रींना लाँच केले आहे.

एम. जी. रामचंद्रन, शिवाजी गणेशन, रजनीकांत, कमल हासन, विजय, अजित कुमार, सुरिया, विक्रम, धनुष, नयनथारा, ज्योतिका, त्रिशा कृष्णन या स्टार्सचे प्रचंड असे फॅन फॉलोइंग आहे.

चित्रपटांसाठी जास्त मानधन घेणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव आहे.

Famous Music Composer in Tamil Film Industry : तमिळ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध संगीतकार

तमिळ सिनेमाच्या अविभाज्य भागांपैकी महत्वाची गोष्ट म्हणजे संगीत.

सिनेमातल्या गाण्यांसाठी देखील कॉलिवूड ओळखले जाते. तमिळ चित्रपटांसाठी पिढ्यानपिढ्या टिकून राहील,

लक्षात राहील असे संस्मरणीय संगीत तयार करणारे काही प्रसिद्ध संगीतकार म्हणजे इलैयाराजा, ए.आर. रहमान, हॅरिस जयराज, युवन शंकर राजा, अनिरुद्ध रविचंदर आणि जी.व्ही. प्रकाश कुमार. तमिळ गाण्यांचे भारतातील आणि परदेशातील प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर कौतुक केले.

अनेक देशांमध्ये तामिळ सिनेमांची क्रेझ :

तमिळ सिनेमाने आपली बाजारपेठ तमिळनाडू सोबत बाहेरही म्हणजे भारताच्या बाहेर विस्तारली आहे.

श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड स्टेट्स यांसारख्या तमिळ भाषिक लोकसंख्या लक्षणीय प्रमाणात असलेल्या देशांमध्ये तामिळ सिनेमाचे अस्तित्व आहे.

तमिळ चित्रपटांना हिंदी, तेलुगु, मल्याळम, कन्नड, इंग्रजी, फ्रेंच, जपानी आणि चायनीज यांसारख्या इतर भाषांमध्ये देखील डब केले जात आहे.

जगभरातील लाखो दर्शकांसाठी हे मनोरंजन आणि प्रेरणास्रोत असलेला असा हा तमिळ सिनेमा आहे. तमिळ चित्रपट हे भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीत एक अभिमानास्पद आणि मौल्यवान योगदान देणारे thrle आहे.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...