Thursday , 30 May 2024
Home कर काड्या Sajini Shinde Ka Viral Video : ‘सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’चा ट्रेलर रिलीज.
कर काड्यावाच ना भोहिडयो

Sajini Shinde Ka Viral Video : ‘सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’चा ट्रेलर रिलीज.

Sajini Shinde Ka Viral Video
Sajini Shinde Ka Viral Video

Sajini Shinde Ka Viral Video : ‘सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ या थरारक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्याबरोबर हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सजिनी शिंदे सोबत नेमकं काय झालं असेल? या सारखे अनेक प्रश्न हा ट्रेलर पाहिल्यानंतर आपल्याला पडतात.

Sajini Shinde Ka Viral Video : हा चित्रपट नेमका काय आहे?

साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ हा एक रोमांचक आणि स्पर्शकारक चित्रपट आहे, जो समाजातील पूर्वाग्रह, अन्याय, आणि सत्याचे संघर्ष यांच्यावर आधारित आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवले आहे की, गुन्हे शाखेची अन्वेषक, बेला (निम्रत कौर) हरवलेल्या सजिनीला शोधण्याची केस हाती घेते.

बेला ही केस सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत असते. त्यानंतर काय घडत हे आपल्याला सिनेमा पाहिल्यावरच समजेल.

star cast of this cinema : या चित्रपटामध्ये कलाकार कोण आहेत?

या सिनेमामध्ये सुबोध भावे, राधिका मदन, निम्रत कौर, भाग्यश्री, चिन्मय मांडलेकर, शशांक शिंदे आणि सुमीत व्यास यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

तसेच मिखिल मुसळे यांनी “सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ” या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

तर मिखिल मुसळे आणि परिंदा जोशी यांनी चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली असून अतिरिक्त पटकथा आणि संवाद अनु सिंग चौधरी आणि क्षितिज यांनी लिहिले आहेत.

Sajini Shinde Ka Viral Video Trailer : ‘सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’चा ट्रेलर

सुबोध भावेने देखील या सिनेमाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडियाच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

“सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ” हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

“सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ” हा थरारक चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तुमच्या वैचारिकतेचा हलवून सोडणारा हा चित्रपट असणार आहे.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...