Sunday , 15 September 2024
Home वाच ना भो Lady Spy Movie : यशराज फिल्म्सच्या स्पाय सिरीजमध्ये आता Lady Spy Movie
वाच ना भो

Lady Spy Movie : यशराज फिल्म्सच्या स्पाय सिरीजमध्ये आता Lady Spy Movie

Lady Spy Movie
Lady Spy Movie : Letstalk

Lady Spy Movie : YRF स्पाय युनिव्हर्स हे यशराज फिल्म्सद्वारे निर्मित आणि वितरीत केलेल्या भारतीय गुप्तचर ऍक्शन चित्रपटांचे एक विश्व आहे ज्याला स्पाय युनिव्हर्स असे पण म्हणतात.

ह्या फ्रँचायझीची सुरुवात 2012 मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटातून झाली, ज्यात सलमान खान आणि कतरिना कैफ यांची भूमिका होती.

जगभरात 300 कोटीपेक्षा जास्त कमाई करत हा चित्रपट सुपरहिट ठरला.

2017 च्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने स्पाय युनिव्हर्सचा विस्तार केला, जो एक था टायगरचा सीक्वल होता. जगभरात 400 कोटीपेक्षा जास्त कमाई करून हा चित्रपट सुपरडुपर ठरला.

2019 मध्ये, YRF ने ‘वॉर’ हा चित्रपट रिलीज केला, जो स्पाय युनिव्हर्सचा एक स्वतंत्र चित्रपट होता.

परंतु एक था टायगर आणि टायगर जिंदा है या पात्रांशी कनेक्ट असल्याचे हा सिनेमा दाखवतो.

हेही वाचा : Upcoming Tata SUV Cars 2023 : टाटाच्या नव्या SUV कार लाँच होणार..! कोणत्या आहेत ‘या’ SUV Cars?

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांनी अभिनय केलेल्या या चित्रपटाने जगभरात 475 कोटीपेक्षा जास्त कमाई करून व्यावसायिक यश मिळवले.

ह्या स्पाय युनिव्हर्सचा सर्वात अलीकडील चित्रपट ‘पठाण’ आहे, जो 2023 मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण आहेत.

ह्यातही एक था टायगर सिरीज आणि वॉर मधले काही संदर्भ जोडलेले आहेत.

या चित्रपटाने जगभरात 1000 कोटीपेक्षा जास्त कमाई करून आजवरचा सर्वात सुपर डुपर हिट सिनेमा असा मान मिळवला.

YRF ने घोषणा केली आहे की YRF स्पाय युनिव्हर्समध्ये आणखी अनेक चित्रपट तयार होत आहेत.

यामध्ये टायगर 3, वॉर 2, आणि टायगर व्हर्सेस पठाण आणि एक स्त्री पात्र प्रमुख स्पाय असेल असा सिनेमा.

Lady Spy Movie : कोण असेल ही नायिका?

स्पाय युनिव्हर्स मधला नायिकाप्रधान सिनेमा कसा असेल ह्याची आता उत्सुकता लागून राहिली आहे. दीपिका, कतरिना की आलीया भट्ट?

सध्यातरी अनेकांनी आलियाच असेल मुख्य भूमिकेत असा दावा केलेला आहे. भारतात फ्रँचायझी सिनेमांना चांगलेच यश मिळू लागले आहे.

स्पाय युनिव्हर्स हा अनेकांना भावणारा सिनेमा प्रकार आहे. बघुयात कोण असेल नायिका.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...